Income Tax on Agriculture : शेतजमिनीवर सरकार आयकर आकारेल का? विभागाचे नियम काय सांगतात?

Income Tax on Agriculture : आपल्या देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष याप्रकारे काही कर आकारले जातात. देशात वावरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सरकारच्या तिजोरीला लागू होणारे सर्व कर भरणे अनिवार्य असते. प्रत्यक्ष करा बद्दल बोलायचं झाल्यास आयकर हा यामधला सर्वात महत्त्वाचा कर प्रकार आहे. तुम्ही जर का शेतकरी असाल आणि तुमचे शेत जमीन असेल तर नेमक्या शेतजमीनीवर कोणत्या प्रकारचा आयकर भरावा लागतो याबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही अशी माहिती तुम्हाला अनेकांनी दिली असेल. तसेच अनेक वेळा आपण शेत जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही असे म्हणतो, जे पूर्णपणे चुकीचे आहे.

शेत जमिनीचे प्रकार कोणते?

शेत जमिनीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, पहिल्या श्रेणीत गावात केली जाणारी शेती मोजली जाते ज्याला आपण ग्रामीण शेती असे म्हणतो तर दुसऱ्या श्रेणीत शहरी भागातील शेती मोजली जाते त्याला शहरी शेती असे म्हटली जाते. मात्र काही जागा अशाही आहेत ज्या शहरांमध्ये येतात, इथे शेत जमीनी आहेत आणि लोकं शेती देखील करतात मात्र आयकार विभागाकडून त्यांना शेत जमीनी म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत.

काय सांगतो आयकर विभागाचा कायदा: (Income Tax on Agriculture)

आयकर विभागाच्या कलम 2 (14) मध्ये कोणत्या जमिनी शेतजमिनी मानल्या जातात याबद्दल माहिती दिली गेली आहे. जर का एखादी जमीन नगरपालिका, अधिसूचित क्षेत्र समिती, नगर क्षेत्र समिती किंवा Cantonment Board च्या अंतर्गत येत असेल आणि तिथली लोकसंख्या ही दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर याला शेतजमीन असं म्हटलं जात नाही.

महापालिका किंवा Cantonment Board ची लोकसंख्या ही 10 हजाराहून अधिक परंतु 1 लाखापर्यंत असेल आणि आजूबाजूच्या 2 किलोमीटरच्या परिघात येणारी जमीन ही शेत जमीन मानले जात नाही, तसेच महापालिका किंवा Cantonment Boardची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंत असेल तर त्याच्या आजूबाजूच्या 6 किलोमीटरच्या त्रिजेतील क्षेत्र हे शेत जमीन म्हणून ग्राह्य धरली जात नाही. आणि सर्वात शेवटी नगरपालिका किंवा Cantonment Board ची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास आणि आजूबाजूच्या 8 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात असलेली जमीन ही शेत जमीन म्हणून गणली जात नाही.

या जमिनीवर कर आकारला जाणार नाही:

जर का वर नमूद केलेल्या कार्यक्षेत्रात तुमची शेत जमीन येत असेल तर कायद्याच्या दृष्टीने ही शेत जमीन म्हणून गणली जाणार नाही. दुसरी बाब म्हणजे आयकर नियमानुसार शेतजमीन ही भांडवली मालमत्ता नाही, म्हणून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही भांडवली नफा कर (Income Tax on Agriculture) आकारला जात नाही.

मात्र इथे सादर केलेल्या श्रेणीमध्ये जर का तुमची जमीन येत नसेल तर सरकारच्या दृष्टीने त्याला भांडवली मालमत्ता समजली जाईल आणि म्हणूनच त्याला शहरी शेतजमीन म्हणत विक्रीवर मिळणाऱ्या रकमेवर तुम्हाला भांडवली नफा भरावा लागेल (Income Tax on Agriculture). जर का शहरी शेतजमीन 24 महिने ठेवल्यानंतर विकली गेली तर त्यावर दीर्घकालीन भांडवली नफा आकारला जाईल. यावर Indexation Benefits सह 20 टक्क्यांचा कर लागेल. मात्र 24 महिन्यांच्या आत जर का जमिनीची विक्री झाली तर नफ्यावर तुमच्या Slab नुसार भांडवली नफ्याच्या रकमेवर आयकर आकारला जाईल.