Income Tax Raid In Goa : इन्कम टॅक्स विभागाची गोव्यात छापेमारी; हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची कसून चौकशी

Income Tax Raid In Goa : दोन-तीन दिवसांपूर्वी आपण नवीन वर्षाचं अगदी जल्लोषात स्वागत केलं. नवीन वर्ष म्हटलं की घडून गेलेल्या सर्व चुका विसरत मात्र त्यातून योग्य ती शिकवण घेत नवीन सुरुवात करणे होय. आपल्यापैकी अनेक जणांनी ह्या वर्षाची सुरुवात जवळच्या मंडळींसोबत केली असेल. कोणी घरीच छोटीशी पार्टी करून नवीन वर्षाचे स्वागत केले तर, कुणी परिवारासोबत आणि मित्रमंडळींसोबत बाहेर जात धुमधडाक्यात नवीन वर्षाला आपलंसं केलंय. इयर एंडिंग आणि नवीन वर्ष म्हटलं की आपोआप आपल्या डोळ्यासमोर पहिलं चित्र उभे राहत ते म्हणजे गोवा. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या पार्ट्या ह्या कुणाच्या नजरेपासून चुकलेल्या नाहीत. आयुष्यात कधीतरी गोव्याला जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करावं असं अनेकांचं स्वप्न असेल. “गोवा” म्हटलं की “तिथे जाण्याचे प्लँन्स हे हमखास रद्द होतात” असं विनोदात्मक शैलीतून म्हटलं जातं, मात्र तरीही नाताळ, एंडिंग आणि नवीन वर्षचं औचित्य साधून अनेक पावलं गोव्याच्या दिशेने वळलेली दिसतात. नवीन वर्षाचा जल्लोष कुठेतरी आटोक्यात आल्यानंतर आता आयकर विभागाने गोव्याच्या काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर छापे टाकायला सुरुवात केली आहे. का? ते जाणून घेऊया.

गोव्यात आयकर विभागाने टाकला छापा: (Income Tax Raid In Goa)

नाताळचे स्वागत आणि नवीन वर्षाची धुमधाम कमी झाल्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या किनारी भागांमध्ये असलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट वर छापा टाकायला सुरुवात केली आहे. केवळ देशभरातूनच नाही तर अनेक विदेशांमधून पर्यटक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याचे निवड करतात. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन वर्ष म्हटलं की गोवा हीच संकल्पना चालत आली आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार बंगळूरहून आयकर अधिकाऱ्यांची पथके गोव्यात दाखल झाली आहेत आणि गोव्यातील एका मोठ्या कंपनीच्या पाच ते सात स्थानांवर एकाच वेळी विभागाकडून धाड टाकण्यात आली.

नवीन वर्ष आणि नाताळ म्हटलं की गोव्यात कळंगुट, बागा, कांदोळी, हरमल, मोरजी तसेच कोलवा, बेतालबाती व अन्य किनाऱ्यांवर पब्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये मोठी गर्दी जमलेली दिसते. गोव्यातील अनेक हॉटेल्सच्या बाहेर मोठ्याच्या-मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात आणि याच परिस्थितीचा फायदा घेत स्थानिक मालकाने आयकर चुकवला आहे असा संशय आयकर विभागाला आला असून त्यांनी गोव्यात येऊन विविध स्थानावर छापा टाकला असावा अशी शंका वर्तवली जात आहे (Income Tax Raid In Goa). सोमवारपासून आयकर विभागाचे अधिकारी गोव्यातील मोठमोठ्या कंपनीच्या हॉटेल्स व पब्सची झडती घेत आहेत व स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इथून आयकर विभागाने भली मोठी रक्कम देखील जप्त केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.