Income Tax Return : 31 डिसेंबरपर्यंत भरा तुमचा ITR; अन्यथा होईल मोठं नुकसान

Income Tax Return: ITR म्हणजे Income Tax Return, प्रत्येक आर्थिक वर्षात एखाद्या व्यतींकडून कमावलेले पैसे आणि त्यावर भरलेला कर यांची माहिती आयकर विभागपर्यंत पोहोचवण्याचं काम इनकम टॅक्स रिटर्नच्या द्वारे केलं जातं, याला मराठीमध्ये आयकर विवरणपत्र असे म्हणतात. आयकर विभागाकडून 31 जुलै 2023 अशी ITR भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती आणि आता हि मुदत संपली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत देशभरातून 6.50 कोटींपेक्षा अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत. ज्यांमध्ये अंतिम दिवशी एकूण 36.91 लाख लोकांनी विभागाजवळ ITR सुपूर्त केले होते. मात्र अद्याप ज्या लोकांनी या सूचनेची दाखल घेतलेली नाही त्यांचं काय? आयकर विभागाकडून त्यांच्याविरुद्ध गुन्ह दाखल केला जाईल का?

तुम्ही ITR भरला नाहीत का? (Income Tax Return)

आयकर विभाग त्याची जबाबदारी अगदी चोख पार पडत असल्याने तुम्ही अद्याप नियमांचे पालन केलेलं नसेल तर हि बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. पण काही कारणास्तव जी लोकं दिलेल्या वेळेत ITR भरण्यात अयशस्वी ठरली आहेत, त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. आर्थिक वर्ष 2022-23 यासाठी विभागाकडून उशिरा ITR भरण्याची मुदत 31 डिसेंबर 2023 म्हणजेच वर्षाच्या अखेरपर्यंत वैध करण्यात आली आहे. पण लक्ष्यात घ्या हा “उशिरा ITR जमा करण्याचा काळ” असल्यामुळे दंडात्मक काही रक्कम नक्कीच आकारली जाणार आहे.

आयकर नियमांच्या अनुसार उशिरा ITR भरणाऱ्या लोकांना मिळकती प्रमाणे दंडाची रक्कम भरावी लागेल. 5 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या माणसाला 1,000 असा दंड भरावा लागणार आहे, तर 5 लाख रुपयांपेक्षाही अधिक मिळकत असलेल्या मंडळींना 5,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो (Income Tax Return). त्याच बरोबर ITR भरण्यात उशीर झाल्याने तुमच्या तपशिलांची छाननी केली जाऊ शकते, यावर ऑडिट आणि चौकशी केली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच उशिरा ITR भरणाऱ्या लोकांना कर परतावा मिळण्यातही उशीर होणार आहे.

उशिरा ITR कसा भरावा?

तुम्हाला जरी ITR भरण्यात विलंब झालेला असला तरीही घाबरून जाऊ नका. कारण ITR भरण्याची प्रक्रिया हि आधी प्रमाणेच राहणार आहे. फरक एवढाच असेल कि आता ITRचा फॉर्म भरताना तुम्हाला संबंधित बॉक्समधील ड्रॉप-डाऊन मेन्यूमध्ये सेक्शन 139(A) च्या अंतर्गत दाखल केलेला रिटर्न (Income Tax Return) निवडावा लागेल. आता उशीर झाला आहे म्हणून रिटर्न भरणं टाळू नका, देशाचे सुजाण नागरिक म्हणून सरकारला जबाब देणं हे आपलं कर्तव्य आहे. उशीर झाल्यामुळे काही टक्के शुल्क भरावे लागेल पण यामुळे पुढच्यावेळी ITR च्या बाबतीत कोणतीही बेफिकिरी केली जाणार नाही.