Income Tax Rules for Saving Account : जवळपास आज प्रत्येक माणूस बँक मधल्या बचत खात्याचा म्हणजेच सेविंग अकाउंटचा (Saving Account) वापर करत आहे. एखाद्या कुटुंबात निदान 2 ते 3 बचत खाती असतील असा सरासरी अंदाज लावला जाऊ शकतो. बँक याच खात्यांवर केलेल्या बचतीप्रमाणे व्याज देऊ करते हे खरंय पण कधी या व्याजाच्या रकमेवर लागू होणाऱ्या कराबद्दल माहिती मिळवली आहेत का? काही लोकांना याच बचत खात्यावर लागणाऱ्या करापासून कसं दूर राहता येईल असा प्रश्न सतावत असतो मात्र आता काळजी करू नका कारण याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही मांडणार आहोत. पैसे म्हटलं की बचत हि आलीच, आणि बचत केलेल्या रकमेवर आणखीन कर भरावा लागू नये म्हणून अनेकांची धडपड सुरु असते. अश्या धडपडीत अनेकवेळा चुकीचे निर्णय घेतले जातात जे का सरकारच्या नजरेत आले तर मोठ्या नुकसानीचा सामना देखील करावा लागू शकतो.
बँकेत बचत खाते आहे का?
आजच्या घडीला प्रत्येक कुटुंबातील किमान दोन ते तीन माणसांची बचत खाती बँकांमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून या ना त्या मार्गाने आपण पैश्यांची बचत करीत असतो, सुरु असलेला हा काळ देखील महागाईचा आहे आणि बाजारातील तज्ञांच्या माते येणाऱ्या दिवसांत हि महागाई अजून वेगाने वाढू शकते म्हणून सामान्य माणसाच्या हातात गरजेच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तरी किमान पैसे हातात असणे महत्वाचे आहे. जुन्या काळात लोकं बँकांमध्ये खाती उघडायचे नाहीत पण आजकाल सरकार विविध योजना प्रदान करतो आणि डिजिटल क्रांतीमुळे पैश्यांची गुंतवणूक किंवा व्यवहार सोपे झाल्यामुळे अनेक लोकं बचत खात्यांकडे वळत आहेत. बँक खाते उघडताना तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध करून देईल ज्यात, बचत आणि चालू खाते असे दोन पर्याय सामावले जातात. दोन्ही पर्यायांचा स्वतंत्र फायदे आणि तोटे असले तरीही तुमच्या गरजेनुसार तुम्ही खात्याच्या प्रकाराची निवड करावी.
बचत खात्यात रक्कम जमा करत आहात का?
अनेकवेळा नोकरदार वर्ग बचत खात्याची निवड करतो. दर महिन्याला मिळणार पगार त्यांना थेट बचत खात्यात जमा करता येतो आणि यावर मिळणाऱ्या व्याजाचाही फायदा मिळवता येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? या बचत केलेल्या रकमेची नोंद थेट आयकर विभागाकडे केली जाते (Income Tax Rules). तुमच्या बचत खात्यातली रक्कम जर का जास्त असेल तर आयकर विभागाच्या नियमांनुसार तुम्हाला अधिक कर भरावा लागेल. बचत खात्यात पैश्यांची गुंतवणूक करण्यावर कोणतीही सीमा लावली जात नाही मात्र आयकर विभागाच्या मर्यादा जाणून घेऊनच गुंतवणूक करावी जेणेकरून अधिक कर भरावा लागणार नाही.
असे आहेत बचत खात्यावरील आयकर नियम (Income Tax Rules for Saving Account):
अलीकडेच आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्नबद्दल नोटीस (Income Tax Rules for Saving Account) जारी केली होती. या इन्कम टॅक्स रिटर्नमधून आपण विभागाला उत्पन्नाचे स्रोत आणि गुंतवणुकीची माहिती देत असतो. आणि देशातील प्रत्येक कमावत्या रहिवाश्यासाठी हि नोंद विभागाकडे करवणे बंधनकारक आहे. याच इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये तुम्ही बचत खात्याच्या गुंतवणुकीबद्दल माहिती देत असता आणि नंतर टॅक्सस्लॅब नुसार विभागाला काही प्रमाणात कर भरावा लागतो. मात्र कर रोखण्यासाठी कधीही चुकीच्या पद्धतींचा अवलंब करू नका. सुजाण नागरिक बनून नेहमीच सरकारजवळ अपेक्षित कराची रक्कम वेळेत जमा करा.