Income Tax Rules: घरात भलीमोठी कॅश आहे? जपून राहा!! आयकर विभागाचा छापा ठरेल घातक

Income Tax Rules: काही वेळा आपण पैशांची भली मोठी रक्कम घरातच ठेवतो. मात्र आम्ही तुम्हाला पैशांच्या याच रकमेबद्दल आज एक महत्त्वाची माहिती देणार आहोत. पैसे घरात ठेवणाऱ्या प्रत्येकाला याबद्दल जाणीव असली पाहिजे. घाबरू नका!! हे कुठल्या चोरी दरोडेखोरीचं प्रकरण नाही तर इन्कम टॅक्सच्या बाबतीत आहे. कोरोनाच्या काळात अधिकांश व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने व्हायला सुरुवात झाली. ज्यामध्ये डिजिटल पेमेंटचाही सहभाग होता. यूपीआय (UPI) चा वापर करून पेमेंट करण्याच्या संख्येमध्ये तर आपण बाजी मारत नवीन विक्रमच रचला आहे. देशातील केवळ तरुण पिढीच नाही तर वयस्कर माणसं सुद्धा मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देतात. मात्र या डिजिटल युगातही अनेक व्यवहार हे पैशांची रोख रक्कम देऊनच केले जातात. कदाचित काही लोकांना इंटरनेट द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर पूर्णपणे विश्वास बसला नसेल. कारण काहीही असले तरी आयकर विभागाचा हा नियम तुम्हाला माहीत असला पाहिजे म्हणूनच आजची ही बातमी सविस्तर वाचा.

रोख देऊन व्यवहार करीत आहात का? (Income Tax Rules)

डिजिटल युगात आजही अनेक लोकं मोठी रक्कम घरात ठेवून आर्थिक व्यवहार करण्याला प्राधान्य देतात. मात्र तुमची हीच सवय आयकर विभागाच्या नजरेस आल्यास भलामोठा परिणाम भोगावा लागू शकतो. आयकर विभागाकडून करचोरी आणि काळा पैसा पकडण्यासाठी काही नियम तयार केले गेले आहेत. त्यानुसार जर का एखादी रक्कम विभागाला तुमच्या घरी सापडली तर याचा अर्थ विपरीत निघू शकतो.

लक्षात घ्या की, आयकर विभागाच्या नियमानुसार घरात नेमकी किती रक्कम ठेवावी याबद्दल कोणतेही विशेष नियम किंवा मर्यादा लावण्यात आलेली नाही. तुमची आर्थिक क्षमता आणि गरज यानुसार तुम्ही कितीही रक्कम घरात ठेवू शकता मात्र ही एवढी मोठाली रक्कम तुमच्याकडे कुठून आली याबद्दल सविस्तर उत्तर आणि रकमेचा स्त्रोत तुमच्याजवळ असलाच पाहिजे. कारण कधी तपास यंत्रणांकडून तुमची चौकशी झालीच तर हा स्त्रोत दाखवतो की तुम्ही निरपराधी आहात. शिवाय तुम्ही स्वतः जवळ इन्कम टॅक्स रिटर्नचे डिक्लेरेशन कायम जपून ठेवावे, याचा अर्थ असा होतो की तुम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावलेले नाहीत. तुमच्याजवळ मोठी रोख रक्कम असली तरी सुद्धा वेळोवेळी सरकारला तुम्ही याबद्दल माहिती पुरवली आहे.

सरकारला पैशांचा स्त्रोत सांगू शकला नाहीत तर?

एखाद्या वेळेस जर का तुमच्या घरात मोठाली रक्कम सापडली आणि सरकारला तुम्ही या पैशांचा स्त्रोत सांगू शकला नाहीत तर मात्र एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यानंतर आयकर विभाग (Income Tax Rules) तुमच्या विरुद्ध तपास यंत्रणेला कामाला लावेल, आणि तुम्ही किती कर भरला आहेत याची तपासणी करेल आणि जर का या दरम्यान काही अघोषित रक्कम आढळली तर आयकर भागाकडून तुमच्या विरुद्ध ठोस कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही निरपराधी जरी असला तरी तुमच्याकडे अघोषित रकमेच्या 137 टक्क्यांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या म्हणण्यानुसार तुम्ही एका वेळी जर का 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढणार असाल तर तुमच्याजवळ पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच एका आर्थिक वर्षात जर का तुम्ही 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली असेल तर त्यासाठी टीडीएस भरावा लागतो. मात्र हा नियम फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांनी सलग तीन वर्ष इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नाही. इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला लोकांना मात्र या प्रकरणात थोडासा दिलासा दिला जातो. तुम्हाला टीडीएस न भरता बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँक खात्यातून एका आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपर्यंत रोख काढता येते आणि जर का तुमचा आकडा 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल तर मात्र 2 टक्के टीडीएस भरावा लागलो.