बिझनेसनामा ऑनलाईन । भारतात स्टीलचा व्यवसाय म्हटलं कि एकाच नाव समोर येतं ते म्हणजे जिंदाल ग्रुप्स (Jindal Groups). जिंदाल ग्रुप्सना भारतात आणि विदेशातसुद्धा ओळखलं जातं. जिंदाल ग्रुप्सनी आपला व्यवसाय यशस्वीपणे सर्वदूर पसरवलेला आहे व आता आफ्रिकन बाजारपेठेत हाच व्यवसाय नेण्याच्या तयारीत आहेत. नायजेरिया येथे पोलाद मिल(Steel Mill) तर बोत्सवानमध्ये एक पॉवर प्लांट (Power Plant) उभारण्याची जिंदाल ग्रुप्सची योजना आहे. हि योजना सत्यात उतरल्यास जिंदाल ग्रुप्स हे आफ्रिकेत व्यवसाय सुरु करणाऱ्या उद्योगपतींपैकी एक होतील.
आफ्रिकेतच व्यवसाय का सुरु करणार? Jindal Groups
जिंदाल ग्रुप्स यांनी भारतात व्यवसाय सुरु करून बराच काळ झाला आहे, व सध्या ते आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहेत. उर्जा आणि पोलाद हा त्यांचा व्यवसाय जगभर नेण्याची त्यांची इच्छा आहे. आफ्रिकेत व्यवसाय घेऊन जाण्याच प्रमुख कारण म्हणजे येणाऱ्या काही दिवसांत आफ्रिका या देशात पोलादाच्या उद्योगात वाढ होण्याची शक्यता आहे. आफ्रिकेत 5 दशलक्ष टन पोलादाचा वापर होतो व दिवसेंदिवस तो 10% दराने वाढत आहे. आफ्रिका हा एक प्रगती करणारा देश आहे, त्यामुळे विदेशातील अनेक ठिकाणाहून या देशात गुंतवणूक केली जात आहे. इथे उत्तम बाजारपेठ व मुबलक कच्चा माल उपलब्ध असल्यामुळे अनेक कंपन्या इथे गुंतवणूक करू पाहतात.
असे आहेत जिंदाल ग्रुप्सचे पुढील प्लॅन्स :
वल्कल स्टील हि जिंदाल ग्रुप्सची (Jindal Groups) खासगी कंपनी आहे, जिने आता 3 दशलक्ष टन क्षमतेचा पोलाद प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांचीच अजून एक कंपनी म्हणजे जिंदाल पावर हि थर्मलची सुरुवात करणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी देशात खनिजे आणि वीज यांचे अनेक करार केले आहेत. जिंदाल ग्रुप्स हे भारताबाहेर यशस्वी कामगिरी पार पडत आहेत. सध्या ओमान या देशात वाढत्या स्टील मागणीला लक्षात घेत त्यांनी तिथे सुद्धा गुंतवणुकीला सुरुवात केली आहे.