India Canada Relations | भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांतील संबंध काही दिवसांपासून बिघडले आहेत. खलिस्तानी दहशदवाद्याच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन तृडो यांनी केलेला आहे. तसेच भारताने कॅनडा हा देश दहशदवाद्यांसाठी सुरक्षित स्थान असल्याचे विधान केल्याने दोन्ही देशांमधले संबंध चिघळले आहेत. याचा वाईट परिणाम मात्र आता स्टार्टअप कंपन्यांवर होऊ शकतो.
कॅनडाची भारतीय कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक–
कॅनडा पेन्शन प्लेन इन्वेस्टमेंट बोर्डने स्टोक एक्सचेंजमध्ये नाव नसलेल्या अनेक भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यात फ्लीपकार्टसह इतर कंपन्यांचा समावेश आहे. कॅनडा पेन्शन प्लेन इन्वेस्टमेंट बोर्डने भारतीय कंपन्यांमध्ये जवळपास 21,440.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बोर्डची सर्वात मोठी 7,633 कोटी रुपयांची गुंतवणूक Eruditus या कंपनीमध्ये आहे. तर फ्लीपकार्ट या सर्वपरिचित कंपनीमध्ये 6,663.6 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय रिन्यू पॉवरमध्ये 2,310 कोटी रुपये गुंतवलेले आहेत.
व्यापारी संबंध कायम राहतील का? India Canada Relations
कॅनडाची भारतीय कंपन्यांमध्ये जवळजवळ एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्ती गुंतवणूक आहे(India-Canada Business). ज्यातील लीस्टेड कंपन्यांमध्ये Paytm, Nayaka आणि Zomato या प्रसिद्ध कंपन्यांची नावं आहेत. वर्ष 2022-23 मध्ये भारताने कॅनडामध्ये 4.10 अब्ज डॉलर्स वस्तूंचा व्यापार (Export) केला होता. तर कॅनडाकडून 4.05 अब्ज डॉलर्स वस्तूंचा व्यापार करण्यात आला होता. आता दोन्ही देशांमध्ये सुरु झालेल्या वादाचा परिणाम या व्यापारांवर होऊ शकतो. दोन्ही देशांमधील उत्पादनांचे प्रकार वेगवेगळे असल्यामुळे देशांची आपापसात स्पर्धा नाही. राजकीय संबंध कितीही बिघडले असले तरीही व्यापारी संबंधांवर (India Canada Relations) त्याचा परिमाण होणार नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तरीही खरी परिस्थिती काय होते हे पाहणं रंजक ठरणार आहे.