India Canada Relations : भारतासोबत घेतेला पंगा कॅनडाला महाग पडणार? तिजोरीला बसणार मोठा फटका

India Canada Relations | भारत आणि कॅनडामधील वाद आता कुणापासून लपलेले नाहीत.दोन्ही देशांमधील राजकीय वादाचा परिणाम त्यांच्या व्यावसायिक संबंधांवर देखील पडत आहे. याचा मोठा फटका दोन्ही देशांच्या बाजारांना बसल्यामुळे व्यापाराला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. कॅनडा आणि भारत यांची अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे दोन्ही देशांना याचा त्रास होणार आहे.

भारताबरोबर वादामुळे कॅनडाला फटका(India Canada Relations)

भारताबरोबर झालेल्या वादामुळे कॅनडा आणि भारतामधील इम्पोर्ट एक्सपोर्ट नक्कीच बदलणार आहे. यामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. पण याशिवाय इथे स्थायिक भारतीय नागरिकांच्या नाराजीचा कॅनडाला जास्ती मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, कॅनडात राहणारे आणि शिक्षण घेणारे भारतीय तिथल्या अर्थव्यवस्थेत 3 लाख कोटी रुपयांचे योगदान देतात. तिथे स्थायिक 20 लाख भारतीयांचा अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. तसेच कॅनडामध्ये शिकणारे साडेतीन लाख विद्यार्थी देशाच्या तिजोरीत 4.9 अब्ज डॉलर्सचे योगदान देतात, मात्र आता वादानंतर भारतीयांच्या नाराजीमुळे कॅनडाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

कृषिप्रधान भारताचे कॅनडामध्ये वर्चस्व आहे. कॅनडाच्या एकूण लोकसंखेपैकी 9 लाख 42 हजार 170 पंजाबी नागरिक आहेत, या पंजाबी लोकांचा शेती आणि दुधाच्या व्यवसायात मोठा वाट असल्यामुळे कॅनडा हे नुकसान सहन करू शकत नाही.

कॅनडात भारतीयांचा दबदबा :

कॅनडामध्ये जवळपास सगळ्याच क्षेत्रांमध्ये भारतीयांचे वर्चस्व आहे. अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांमध्ये भारतीयांचा समावेश पाहायला मिळतो, मग ती शेती असो वा आयटी कंपनी. CII च्या रिपोर्टनुसार 2023 पर्यंत मोठ्या भारतीय कंपन्यांनी कॅनडाच्या तिजोरीत 41 हजार कोटी रुपयंची गुंतवणूक केली आहे. शिवाय दरवर्षी भारतातून कॅनडामध्ये जाणाऱ्या लोकांचा आकडा मोठा असतो . वर्ष 2022 मध्ये 1.10 लाख भारतीय कॅनडामध्ये गेले होते.

मोठे व्यवसाय वगळल्यास, भारतीयांची इतर छोट्या व्यवसायांमध्ये सुद्धा 70 हजार कोटींची गुंतवणूक आहे. तसेच कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीयांची संख्या 40% आहे. कॅनडा परदेशी विद्यार्थ्यांकडून चार ते पाच पट जास्ती शुल्क आकारते, त्यामुळे हे विद्यार्थी मोठी रक्कम देऊन तिथे शिक्षण घेतात. हा मोठा आकडा पाहता भारताकडून घेतलेला एक मोठा निर्णय हा कॅनडाच्या आर्थिक परिस्थितीला बदलून टाकू शकतो अशी संभावना आहे. भारत गरजेप्रमाणे इतर देशांसोबत व्यवसाय सुरु करूच शकतो, मात्र कॅनडाला बसणारा फटका नक्कीच मोठा असणार आहे.