India Deal With Argentina : खाण व्यवसायात भारताची अचूक खेळी; अर्जंटिनासोबत केलाय तब्बल 20 कोटींचा करार

India Deal With Argentina : आत्ताच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था अगदी जोमाने वाढत आहे, आणि हि प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट म्हणावी लागेल. अर्थव्यवस्थेतली हीच मजबूत पकड कायम ठेवण्यासाठी भारताने अर्जंटिन या देशासोबत एक नवीन करार केला आहे. भारत सरकारने खेळलेल्या या अनोख्या चालीत आपण अर्जंटिनासोबत 5 लिथियम ब्रेन ब्लॉक्सच्या अधिग्रहणाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, या करारानंतर भारतीय कंपनी अर्जंटिनमध्ये या ब्लॉक्सच्या शोध आणि विकासाचे काम करेल. भारतातील कंपनी Khanij Bidesh India Ltd(KABIL) आणि अर्जंटिनमधील CATAMARCA MINERA Y ENERGÉTICA SOCIEDAD DEL ESTADO यांनी सोमवारी लिथियम ब्राईन ब्लॉक्सचे अधिग्रहण केले. हा करार संपन्न होत असताना भारतचे अर्जंटिनमधील राजदूत दिनेश भाटिया उपस्थित होते, आणि त्यांच्या सोबत केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देखील संपूर्ण करारादरम्यान वर्चुअल माध्यमातून उपस्थिती लावली होती.

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारताचा प्रयत्न: (India Deal With Argentina)

अर्जंटिना आणि भारत यांच्यात झालेला करार हा भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यात मदत करेल. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बोलताना केंद्रीय खान मंत्री प्रल्हाद जोशी म्हणले की, “आम्ही द्विपक्षीय संबंधांचा नवीन अध्याय लिहत असून, हा करार आपल्या शाश्वत भविष्यासाठी महत्वाचा आहे. दोन्ही देशांमधील हा करार मंजूर झाला असल्याने आता Khanij Bidesh India Ltd (KABIL) हि कंपनी अर्जंटिनमधल्या कॉटामार्क या राज्यात 15,703 हेक्टरच्या मोठाल्या क्षेत्रात लिथियमच्या शोधासाठी 5 ब्लॉक्समध्ये खाणकाम सुरु करणार आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकल्प किमान 200 कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो.

भारताला लिथियमची गरज काय?

आपण वापरात असलेले मोबाईल फोन, इलेकट्रीक गाड्या, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा या सर्व वस्तू केवळ लिथियमच्या आधारे चालतात. तसेच देशातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी लिथियम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. सध्या भारतात सरकारकडून इलेकट्रीक गाड्यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे आणि म्हणूनच बाजारातील मागणी आणि गाड्यांच्या व्यवसायात तेजी आलेली पाहायला मिळते, परिणामी भारत आणि अर्जंटिना यांच्यामध्ये झालेला हा करार भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमधले संबंध आपण जाणतो, आणि सध्या भारत बऱ्याच प्रमाणात लिथियमसाठी चीनवर अवलंबून आहे, देशाचे हे अवलंबित्व कमी करण्यासाठी म्हणून सरकारकडून अर्जंटिनासोबत हा करार करण्यात आला आहे(India Deal With Argentina). आत्ताच्या घडीला चिली आणि बोलिव्हियानंतर अर्जंटिनमध्ये लिथियमचा सर्वात मोठा साठा सापडतो. लक्ष्यात घ्या, आपण भारतात 100 टक्के लिथियमची आयात करतो. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडयानुसार वर्ष 2022-23 या काळात आपण जवळपास 23 हजार कोटी रुपयांची लिथियम अयान बॅटरीची खरेदी केली केली आहे, ज्यामध्ये 95 टक्क्यांचा व्यवहार केवळ चीन आणि हॉंगकॉंग सोबत करण्यात आला होता.