India Maldives Issue: भारत सरकारने उगारले मालदीव विरोधात शस्त्र; कालच्या अर्थसंकल्पात केली ‘ही’ मोठी घोषणा

India Maldives Issue: जसं की आपण सगळ्यांनाच माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध बिघडलेत. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या काही राजकारण्यांनी चुकिचा शब्दोचार केल्यामुळे भारतातील जनता संतापली आणि Boycott Maldives सर्वत्र चर्चेचा विषय बनला. आता मालदीवमध्ये सत्तापालट झाला असून नवीन सरकार आल्याने हा वाद आणखीन चिघळला आहे. मात्र आता खुद्द मोदी सरकारच मालदीव विरुद्ध शस्त्र उगारणार असल्याने चीनच्या जवळ जाणाऱ्या मालदीवच्या राष्ट्रपती मुइज्जू यांच्या अडचणी वाढणार आहेत. 

मोदींनी उगारले मालदीव विरुद्ध शस्त्र: (India Maldives Issue)

मालदीवमध्ये सत्तापालट झाल्यानंतर ते चीन सोबत जवळीक साधनायचा प्रयत्न करीत आहेत, या सर्व घडामोडींमध्ये आपले मोदी सरकार सुद्धा मागे नाही. काल सादर झालेला अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी मालदीवच्या निधीत मोठी कपात केली असून लक्षद्वीपसाठी मोठी घोषणा केली आहे. कालच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी मालदीवला देण्यात येणारी आर्थिक मदत 22 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला होता. मालदीवला आर्थिक मदत करणाऱ्यांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक होता, आपण गेल्यावर्षात मालदीवला 770.90 कोटी रुपयांची मदत केली होती, मात्र कालच्या अर्थसंकल्पानुसार यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मोदी सरकारने विदेशी मदतीसाठी 4883.56 कोटी रुपये बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्षद्वीपला मिळणार मोठी मदत:

मालदीवला मिळणाऱ्या मदतीमध्ये जरी भारत सरकारने कपात केली असली तरी हा निधी बऱ्यापैकी लक्षद्वीपच्या बाजूला वळवण्यात आला आहे. कालच्या अर्थसंकल्पात लक्षद्वीपसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलाय(India Maldives Issue), यामुळे आता लवकरच लक्षद्वीप एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ म्हणून उभारेल यात दुमत नाही.