India Maldives Issues: फायद्यापेक्षा देश महत्वाचा; EaseMy Trip च्या एका निर्णयामुळे मालदीवला दणका

India Maldives Issues : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीव यांचे संबंध बिघडले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला असता मालदीवमधल्या मधल्या काही मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध टीकास्त्र सोडले, मात्र या कृतीचा विपरीत परिणाम मालदीवलाच भोगाव लागला असून त्यांची अर्थव्यवस्था बिघडली आहे. भारतात सुरू असलेल्या बॉयकट मालदीव (Boycott Maldives) या सोशल मीडिया मोहिमे अंतर्गत अनेक लोकांनी मालदीवला जाण्याची तिकीटं रद्द केली आहेत, आणि देशांतर्गत चालणाऱ्या ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपन्यांनी त्यांना सहयोग दर्शवल्यामुळेच हे अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले आहे. टुरिझम इंडस्ट्री मधल्या EaseMy Trip या कंपनीने सर्वात आधी मालदीवची सारी बुकिंग रद्द करून टाकली होती. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या चलो लक्षद्वीप (Chalo Lakshadweep ) या नवीन मोहिमे अंतर्गत हीच कंपनी लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांना खास सवलतीच्या दरात तिकिटं उपलब्ध करून देत आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल EaseMy Trip या कंपनीचा नेमका विचार काय हे जाणून घेऊया..

कंपनीला नफ्यापेक्षा देश प्यारा: (India Maldives Issues)

EaseMy Trip या कंपनीने आपल्या नवीन जाहिरातीमध्ये व्यवसायातून नफा कमवण्याआधी देश त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे अशी माहिती प्रस्तुत केली होती. ते पुढे असेही म्हणाले की त्यांनी मालदीवला जाणारी सर्व ट्रॅव्हल बुकिंग रद्द केली आहेत, कारण आमच्यासाठी हा देश सर्वात महत्त्वाचा आहे. कंपनीचे मालकांचे ठाम मत आहे की, भारत हा एक पर्यटन संपूर्ण देश आहे. इथे असलेल्या विविध प्रेक्षणीय स्थळांवर त्यांना अधिकाधिक गर्व आहे. आपल्या देशात 7500 किलोमीटर मोठी समुद्र पट्टी आहे ज्यात अंदमान, गोवा, कोकण, केरळ याप्रमाणेच लक्षद्वीपचा सुद्धा समावेश होतो. आपण सर्वजण आपल्या देशावर भरपूर प्रेम करतो, त्यामुळे या अभियानात आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे.

लक्षद्वीपला जाण्यासाठी कंपनी देतेय डिस्काउंट:

EaseMy Trip या कंपनीने बुधवारी आपल्या ग्राहकांसाठी एक खास डिस्काउंट ऑफर जाहीर केली. Nation First Bharat First असे डिस्काउंट कोड वापरून कंपनीचे ग्राहक सवलतीच्या दरांमध्ये देशांतर्गत प्रवास करू शकतील. कंपनीचे फाउंडर आणि सीईओ यांनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात की, “कंपनीने ग्राहकांसाठी नवीन डिस्काउंट कोड जाहीर केला आहे, ज्याचा वापर करून ग्राहक दिल्लीतून बेंगलोर किंवा मुंबई असा प्रवास करू सवलतीची दरांत करू शकतील. आता हवाई प्रवास करण्यासाठी ग्राहकांना 600 ते 700 रुपयांची सूट उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारत आणि मालदीव (India Maldives Issues) यांच्यात सुरु असलेल्या वादविवादामुळेच देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

मालदीवने सादर केला माफीनामा:

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार EaseMy Trip या कंपनीच्या मोठ्या निर्णयाचा फटका मालदीवला बसल्याने, कंपनीने त्यांनी बुकिंग पुन्हा सुरू करावे अशी याचिका दाखल केली आहे. कंपनीला पाठवलेल्या संदेशात ते म्हणतात की, “भारतीय हे आमच्यासाठी बांधवांप्रमाणेच आहेत”. मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट अँड टूर ऑपरेटर्स (MATATO) यांच्याकडून EaseMy Trip कंपनीसाठी हे पत्र लिहिण्यात आलं होतं. त्यांनी सदर पत्रात भारत देशाची माफी देखील मागितली आहे, ते म्हणतात की गेल्या काही वर्षांपासून मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध चांगले आहेत. टुरिझम सेक्टरमुळे मालदीव मधल्या अर्थव्यवस्थेला मजबुती प्राप्त होते, जवळपास 44000 लोकांचे घर याच व्यवसायावर चालतात म्हणूनच संपूर्ण गंभीर परिस्थितीचा त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहे.