India-Oman Deal : ओमानमध्ये ‘या’ वस्तूंची निर्यात करून भारत करणार कमाई

India-Oman Deal : भारत देशाची सकारात्मकपणे प्रगती होत आहे, याचे प्रमुख उदाहरण म्हणजेच अर्थव्यवस्थेत आलेली तेजी. आपण देशांतर्गत बनणाऱ्या वस्तूंना अधिक प्राधान्य दिल्यामुळे आयातीवर खर्च होणारा पैसा बऱ्याच प्रमाणात देशातच राहतो. ज्याचा फायदा करून घेत केंद्र सरकार देशांतर्गत विविध योजना राबवू शकते. आपण वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापारी संबंध स्थापन केलेले आहेत, यामध्ये बऱ्याच प्रमाणात भारत इतर देशांसोबत विविध वस्तूंची निर्यात करत असतो. आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व गोष्टींचे पालन आपण करत आलोय. आता भारत आणि ओमान यांच्यात होणाऱ्या मोठ्या करारानंतर भारत देश आणखीनच मालामाल होण्याची शक्यता आहे. काय आहे हा नवीन करार जाणून घेऊया….

भारत आणि ओमन यांच्यात होणार करार (India-Oman Deal):

एखाद्या देशाला आर्थिक दृष्ट्या प्रगती करायची असेल तर केवळ देशांतर्गत चालणाऱ्या व्यापारावर अवलंबून राहून चालत नाही. आजूबाजूच्या देशांसोबत व्यवहार करून संपत्तीत वाढ करावी लागते. सध्या भारत आणि ओमान या दोन्ही देशांमध्ये एक मोठा करार होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे आणि यामुळे भारतीय उद्योगाला एक नवीन दिशा मिळेल असेही तज्ञांचे मत आहे. दोन्ही देशांमधला करार जर का यशस्वी झाला तर यानंतर गॅसोलीन, लोह- पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स आणि यंत्रसामग्री यांसारख्या 3.7 अब्ज डॉलर्स किमतीच्या 83.5% हून अधिक भारतीय वस्तूंची ओमानच्या बाजारपेठेत विक्री करण्याची संधी उपलब्ध होणार आहे (India-Oman Deal). सध्या या वस्तूंवर ओमान या देशाकडून पाच टक्के आयात शुल्क आकारले जात आहे आणि या करारानंतर आयातीचा हा कर देखील कमी होऊ शकतो.

काय सांगते माध्यमांची माहिती?

भारत आणि ओमान यांच्यात झालेला करार हा शेवटच्या टप्प्यावर सुरू आहे, शेवटच्या टप्प्यात दोन्ही देश एकमेकांसोबत जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमा शुल्क कमी करता येईल का? किंवा हे शुल्क पूर्णपणे काढून टाकता येईल का? यावर विचार करीत आहेत. दोन्ही देशांमधला करार यशस्वी झाला तर मोटार गॅस ओलीन 1.7 अब्ज डॉलर्स, लोह आणि पोलाद 235 दशलक्ष डॉलर्स, इलेक्ट्रॉनिक्स 135 दशलक्ष‌ डॉलर्स, यंत्रसामग्री 125 दशलक्ष डॉलर्स अश्याप्रकारे या प्रमुख वस्तूंची निर्यात भारताकडून केली जाईल(India-Oman Deal).

केवळ एवढेच नाही तर यानंतर ॲल्युमिनियम ऑक्साईड, कपडा, प्लास्टिक, बोनलेस मीट, मोटार कार इत्यादी अनेक वस्तूंची निर्यात भारत ओमानच्या बाजारात करणार आहे. तरीही तज्ञ म्हणतात कि भारतातून ओमान या देशात निर्यात करण्यात येणाऱ्या 16.5% वस्तूंवर कराराचा विशेष लाभ मिळणार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे या वस्तूंची निर्यात सुमारे 800 दशलक्ष डॉलर्स इतकी असून या वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश देण्यात आला आहे. सदर वस्तूंमध्ये गहू, बासमती तांदूळ, फळे, भाजीपाला, मासे, चहा, कॉफी इत्यादींचा समावेश होतो.