India Per Capita Income । भारताच्या दरडोई उत्पन्नात 2030 पर्यंत वाढ होऊन 4000 डॉलर पर्यंत पोहोचू शकेल. म्हणजेच भारतीय करन्सीच्या हिशोबाने 329122.40 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये हे दरडोई उत्पन्न 2450 अमेरिकी डॉलर म्हणजेच 201587.47 रुपये एवढे आहे. स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकच्या एका रिसर्च रिपोर्टनुसार ही माहिती उघड झाली आहे. या रिसर्च मध्ये सांगण्यात आलं आहे की, उत्पन्नामध्ये होणाऱ्या वाढीमुळे देशाला 6 ट्रिलियन डॉलर्सच्या GDP सह मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था बनण्यासाठी मदत होऊ शकते.
रिपोर्टनुसार, भारताच्या देशांतर्गत व्यापारामध्ये वाढ होत आहे. 2000-1 या काळामध्ये भारतात दरडोई उत्पन्न (India Per Capita Income) 460 डॉलर होते. ते वाढून 2010-11 या काळात 1413 डॉलर पर्यंत वाढले. त्यानंतर 2020-21 मध्ये त्यात अजून वाढ होऊन 2,150 डॉलर पर्यंत पोहोचले. आणि आता 2022 23 मध्ये हे दरडोई उत्पन्न 2,450 एवढे होते. रिपोर्टनुसार, 2030 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीमध्ये विदेशी व्यापार महत्त्वाचा रोल बजावेल. त्याचबरोबर या कालावधीत भारतात परदेशी व्यापार दुप्पट होऊन 2.1 लाख करोड डॉलर पर्यंत पोहोचू शकेल. 2022 23 मध्ये परदेशी व्यापार हा 1.2 लाख करोड डॉलर पर्यंत होता. त्याचबरोबर पुढील कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिला तीन देशांमध्ये सहभागी होईल. आणि 5 ट्रिलीयन डॉलर्स पर्यंत पोहोचेल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य कोणते? (India Per Capita Income)
2023 पर्यंत तेलंगणा 3360 डॉलर दरडोई उत्पन्नसह देशातील अव्वल राज्य ठरलं आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक तर तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचा नंबर येतो. तेलंगणामध्ये दरडोई उत्पन्न हे 2,75,443 रुपये एवढे आहे. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये हे उत्पन्न 2,65,623 रुपये, आंध्र प्रदेश मध्ये 2,07,771 रुपये दरडोई उत्पन्न आहे. परतू 2030 पर्यंत गुजरात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील नंबर १ राज्य ठरेल. यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा क्रमांक राहण्याची शक्यता आहे.