India-Saudi Investment Forum । मागच्या काही दिवसांत G-20 चा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. भारताकडे या संमेलनाचे यजमानपद असल्यामुळे अनेक नजरा भारताकडे खिळून होत्या. सभेच्या शेवटी मिळवलेल्या यशातून हेच दिसून येतं की भारताने आपली जबाबदारी उत्तम रीत्त्या पार पडली आहे. आलेल्या विदेशी देशांना आपण भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. या G-20 संमेलनात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान भारत आणि सौदी अरेबियामध्ये (India-Saudi Investment Forum) तब्बल 50 करार करण्यात आले.
भारत आणि सौदी अरेबियामध्ये नेमके कोणते करार झाले? (India-Saudi Investment Forum)
India-Saudi Investment Forum च्या अंतर्गत दोन्ही देशातील अनेक पोलीसी मेकर्स, बिझनेस लीडर्स आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणण्यात आलं. दोन्ही देशांमध्ये यावेळी पन्नास करार करण्यात आले. या करारांमध्ये ICT, Entrepreneurship, Chemicals, Energy, Advanced Manufacturing Sectors यांचा सामवेश होता. हा करार खालिद अल-फलीह( Khalid Al- Falih) Minister Of Investment- Saudi Arabia आणि पियुष गोयल ( Piyush Goyal) भारताचे वाणीज्य आणि उद्योग मंत्री तसेच निवृत्ती राय( Nivruti Rai) CEO-Invest India यांच्या उपस्थितीत पार पडला.
G-20 चर्चेच्या वेळी The India-Middle East-Europe Economic Corridor ची घोषणा करण्यात आली. ज्यात भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, UAE, फ्रान्स,जर्मनी, इटली आणि EU चा समावेश आहे. या सर्व देशांच्या प्रादेशिक गुंतवणुकिंवर इथे चर्चा करण्यात आली होती. खालिद अल फलीह यांनी भारताबरोबर एकत्र काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. दोन्ही देश मिळून येणाऱ्या दिवसांत मोठं यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी स्पष्ट केला. भारत आणि सौदिकडे अनेक सकारात्मक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून ते आपले ध्येय गाठू शकतात. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दोन्ही देशातील कार्यकारी सरकार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
भारत आणि सौदी या दोन्ही राष्ट्रांचे आर्थिक संबंध चांगले आहेत. याची प्रमुख उदाहरणं म्हणजे भारतीय पंतप्रधानांची 2016 व 2019 मध्ये सौदीला दिलेली भेट व सौदीच्या युवराजची 2019 भारतातील भेट होय. आत्ता सुरु झालेला India-Saudi Investment Forum हे संबंध अजून बळकट करणारा भाग ठरणार आहे. सध्या भारतातील 3,000 कंपन्यांची सौदी सोबत गुंतवणूक आहे.
कोणकोणते करार करण्यात आले –
अल जोमाईह एनर्जी अँड वॉटर आणि अवाडा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आला.
पेट्रोमीन आणि एचपीसीएल यांच्यात संपूर्ण भारतातील एचपीसीएल- चालित इंधन केंद्रांमध्ये पेट्रोमिन एक्सप्रेस सेवा केंद्रे स्थापन करण्याच्या उद्दिष्टासह एक निश्चित करार करण्यात आला.
डेझर्ट टेक्नॉलॉजीज आणि गोल्डी सोलर यांच्यात ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार.
ARCO इंडियन पर्सनल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आणि असोसिएशन ऑफ ओव्हरसीज रिक्रूटिंग एजंट यांच्यात मानवी संसाधनांमध्ये सामंजस्य करार.