Indian Businessman : हे आहेत भारतातील दानशूर उद्योजक; पहा कोणी किती पैसे दान केले

बिझनेसनामा ऑनलाईन । आपल्या देशात श्रीमंत उद्योगपतींची काही कमी नाही( Indian Businessman). अदानी आणि अंबानी हि दोन प्रमुख नावं वगळली तरी सुद्धा असे इतर अनेक लोकं आहेत ज्यांना सधन म्हणता येतं. यात अनेक अभिनेते, खेळाडू व राजकारण्यांचा समावेश आहे. इथे अश्या अनेक लोकांची नावं आढळून येतात जे वेळोवेळी समाज्याच्या भल्यासाठी समोर येत असतात. तर आज जाणून घेऊया भारतातील काही उद्योगपतीबद्दल जे खरोखरच दानवीर आहेत आणि आपले पैसे गरीब लोकांच्या भल्यासाटी दान करतात.

१) शिव नाडर (Shiv Nadar) :

हे HCL ग्रुपसचे फाउंडर आहेत. सध्याच्या घडीला त्यांच्याजवळ 12.6 बिलिअनची संपत्ती आहे, व HCL ही कंपनी भारतातील सर्वात मोठी software service provider आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये शिव नाडर यांनी तब्बल 1,161 कोटी रुपये दान केले होते.

२) अजीम प्रेमजी (Ajim Premji):

अजीम प्रेमजी हे Wipro या कंपनीचे संस्थापक आहेत. या कंपनीकडे 11.06 बिलिअनची संपत्ती आहे. अनेक नावाजलेल्या कंपन्यापैकी Wipro हि एक कंपनी आहे. व गेल्या आर्थिक वर्षात अजीज प्रेमजी यांनी 484 कोटी रुपये दान केले होते.

३) मंगलम बिर्ला (Mangalam Birla):

कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला ग्रुप्सचे चैरमन आहेत. आदित्य बिर्ला हि देशातील एक नावाजलेली कंपनी आहे. आदित्य बिर्ला या कंपनीची Net Worth 15.5 बिलिअन आहे. मागच्या वर्षात त्यांनी तब्बल 242 करोड रुपये दान केले होते.

४) गौतम अदानी (Gautam Adani) : Indian Businessman

गौतम अदानी हे नाव देशात सर्वपरिचित आहे. श्रीमंत व्यक्ती म्हटलं कि अदानी आणि अंबानी हीच नावं समोर येतात. हे अदानी ग्रुप्सचे सर्वेसर्वा आहेत. अदानी यांची एकूण मालमत्ता 32 बिलिअन आहे. व आपल्या जन्मदिनी त्यांनी 60,000 करोड रुपये दान केले होते.

५) अनिल अग्रवाल (Anil Agrawal):

हे भारतातील प्रमुख उद्योगपतीपैकी एक (Indian Businessman) आहेत. त्यांना Metal King असे म्हणून ओळखले जाते. अनिल अग्रवाल हे वेदान्ता ग्रुप्सचे चेअरमन आहे. त्याचं Net Worth 360 मिलिअन आहे. गेल्यावर्षी अनिल अग्रवाल यांनी आपल्या कमाईमधून 27% भाग दान केला होता.