Indian Canada Issue : आनंद महिंद्रांचा कॅनडाला दणका!! बंद केली ‘ही’ कंपनी

बिझनेसनामा ऑनलाईन । भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये सध्या विवाद (Indian Canada Issue) सुरु आहेत. दोन्ही देशांमधील वादाचे कारण म्हणजे कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताविरुद्ध केलेला आरोप आहे. गेल्या आठवड्यात कॅनडाचे पंतप्रधान् Justin Trudeau यांनी विधानसभेत खाल्तीस्तानी सेप्रेटीस्टच्या खुनात भारत सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता . या मोठ्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत, अश्यातच भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कॅनडाला मोठा झटका दिला आहे. महिंद्रा कंपनीने कॅनडातून आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.

भारत आणि कॅनडा वादामुळे परिस्तिथी बिकट: (Indian Canada Issue)

India-Canada: भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती (Indian Canada Issue) निर्माण झाल्यामुळे भारताने कॅनडातील नागरिकांना विसा देणे बंद केले आहे. याच दरम्यान भारतातील एक नावजलेली कंपनी म्हणजे महिंद्रा आणि महिंद्रा यांनी कॅनडा या देशासोबातचे आपले व्यावसायिक संबंध थांबवण्याची घोषणा केली आहे. कॅनडामध्ये कार्यरत कंपनी Resson Aerospace Corporation, Canada हिचे कामकाज वोलेन्टरी बेसिसवर बंद करण्याचा आदेश महिंद्रा आणि महिंद्रा कडून दिला गेला आहे, या कंपनीमध्ये महिंद्रा आणि महिंद्राची 11.18% भागेदारी होती. त्यामुळे आता त्यांचा हा मोठा निर्णय कॅनडाला भारी पडण्याची शक्यता आहे.

महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 20 सप्टेंबर 2023 रोजी त्यांना Certificate Of Dissolution मिळाला आहे व यानंतर इंडिअन अकौन्टिंगच्या अंतर्गत कॅनडामधील कंपनीचे सारे कामकाज आता बंद झाले आहेत. रेशन लीक्विडेशन म्हणून महिंद्रा आणि महिन्द्राला 4.7 कॅनडीअन डॉलर्स मिळणार आहेत, ज्यांची किंमत भारतीय रुपयांमध्ये 28.7 कोटी रुपये होते.

शेअर बाजारात पडझड –

या निर्णयानंतर महिंद्राच्या स्टोक्समध्ये थोडे बदल पाहायला मिळाले, कंपनीच्या शेअर्समध्ये 50.75 उपायांची घसरण झाली. महिंद्राच्या या मोठ्या निर्णयामुळे आता कॅनडाला मोठा झटका बसला आहे. मात्र हे विसरून चालणार नाही की कॅनडाने( India-Canada) देखील झोमेटो, पेटीयम, नायका, कोटक महिंद्रा या सारख्या भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.