Indian Economy 2024: असं म्हणतात कि वर्ष 2024 हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचं वर्ष ठरणार आहे. या वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेने सकारात्मक वाढ करण्याची लक्षणे दाखवली तर आपण उदयास येणारी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू शकतो. गेल्या वर्षभरात आपण अनेक बदल घडवत अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला होता, आणि तो प्रयत्न यशस्वी देखील झाला. यशाची हीच पायरी जर का आपण चढत गेलो तर नक्कीच येणार काळ हा भारताच्या दृष्टीने आनंददायी ठरेल. यावर्षी देशात सार्वत्रिक निवडणूक देखील लढवल्या जातील, याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मात्र याव्यतिरिक्त अर्थव्यवस्थेने एवढा मोठा पल्ला गाठण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भारताचे सुजाण नागरिक म्हणून हे घटक कोणते यांबद्दल आज सविस्तर माहिती मिळवूया..
१) व्याजदर:
भारतातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, देशभरातील बँकांसाठी लागू होणारे सर्व नियम आणि निर्णय हे सर्वोच्य बँक कडून घेतले जातात. या सर्वोच्य बँकच्या अंदाजानुसार वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत महागाईचा आकडा 5 टक्क्यांपर्यंत असेल. जो कि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 5 टक्क्यांपेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे. चलनविषयक धोरण समितीच्या अंदाजे आता देशात व्याजदर कमी करण्याची वेळ आली आहे. गेल्या दशकात सरासरी रेपो दर हा 6-6.5 टक्क्यांच्या आसपास होता, ज्यात 4 टक्क्यांपर्यंतची कपात ही असामान्य परिस्थितीमुळे करण्यात आली होती. आता पुढे चलनवाढीचा दर सुमारे 5 टक्के असण्याची शक्यता आहे.
२) अर्थसंकल्प: Indian Economy 202
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्प प्रस्तुत केला जाईल. हा अर्थसंकल्प मात्र येणाऱ्या निवडणुकांमुळे काही महिन्यांसाठीच वैध असणार आहे आणि म्हणूनच यात कोणतेही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार नाहीत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ते कोणते निर्णय घेईल हे पाहणं आकर्षक ठरणार आहे. वाढीचा अंदाज हा सर्वोत्तम असल्यामुळे आर्थिक वर्ष 2025-26 साठी 4.5 टक्के तुटीचा अंदाज योग्य ठरू शकतो.
३) हवामान आणि मन्सून:
मन्सून हा घटक देखील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम घडवून आणू शकतो. शहरी भागात वस्तूंची मागणी वाढली म्हणजेच ती ग्रामीण भागातही वाढेल असा ठाम विश्वास व्यक्त केला जाऊ शकत नाही. देशातील कृषी क्षेत्रात जरी आपण कार्यरत असलो तरीही मूल्यवर्धित क्षेत्रात हवी तशी कामगिरी झालेली नाही, आणि म्हणूनच मूल्यवर्धित शेती क्षेत्र आणि बिगर शेती क्षेत्र हे एकमेकांपासून विभागले गेले आहेत. 2023 च्या तुलनेत खरीप हंगाम चांगला झाल्यास उद्योगासाठी आणि GDP वाढीसाठी ही चांगली बातमी ठरेल (Indian Economy 2024).
४) अर्थव्यवस्थेची आतापर्यंतची कामगिरी:
आत्तापर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला तर ती लक्षणीय ठरली आहे. जगभरात अनेक राष्ट्रांमध्ये युद्धाचे वातावरण असून देखील आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झालेला दिसून आला नाही. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये वाढीचा अंदाज कमी असला तरीही, हि वाढ खुंटली जाणार नाही. मात्र आपल्याला सध्या वाढीत आलेली तेजी कायम ठेवावी लागणार आहे.
५) गुंतवणूक:
निधी उभारण्याच्या पद्धतीनुसार सध्या गुंतवणुकीचा दर स्थिर आहे. खास करून एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी या ठराविक अशा सेवाविषयक उद्योगांमध्ये आणि पायाभूत क्षेत्रात स्टील आणि सिमेंट क्षेत्रात गुंतवणूक होताना दिसते आहे.
६) कॉर्पोरेट क्षेत्र:
या वर्षात कॉर्पोरेट क्षेत्र नेमकी कशी कामगिरी करून दाखवेल हा अंदाज वर्तवणे मुश्किल आहे, तरीही गेल्या वर्षात मागणी वाढल्यामुळे कंपन्यांनी बरीचशी विक्री केली होती. इनपूट कॉस्टमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने नफ्यावर दबाव आला आहे, आणि फर्म विक्री कमी झाली असतानाही फक्त इनपूट कॉस्ट थंड झाल्याने नफा वाढला आहे (Indian Economy 2024). नवीन वर्षात या दोन्ही गोष्टी स्थिर राहिल्या तर शेअर बाजारावर याचा मोठा परिणाम झालेला दिसून येईल.