Indian Economy : केवळ GDP च नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही भारतासाठी अच्छे दिन

Indian Economy : वर्ष 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भारताच्या जबाबदारीची सूत्र प्रधानमंत्री म्हणून हाती घेतली. त्यानंतर मोदी सरकारच्या अंतर्गत देशात अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या, आणि याचाच परिणाम म्हणून पुढील पाच वर्षांसाठी सुद्धा केंद्र शासनात मोदी सरकार यांचे निवड करण्यात आली. मोदी सरकारची कार्यावळ आता संपुष्टात येणार असून देशात पुन्हा एकदा निवडणुकीचा वारं वाहत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांच वातावरण असतानाच देशाच्या GDP ने सकारात्मक वाढ करायला सुरुवात केली आहे. पण केवळ GDP च नाही तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील आपण सकारात्मक वाढ करत आहोत, आज जाणून घेऊया येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारसाठी देशाचा बाजार कसा काय मदतीचा हात ठरू शकतो…

देशाच्या GDP मध्ये आकर्षक वाढ: (Indian Economy)

जगभरात सध्या मोठमोठे देश त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी धडपडत असताना आपल्या भारताने बाजी मारली आहे. 30 नोव्हेंबर रोजी GDP चे सकारात्मक आकडे समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाचा वापर करत देशातील जनतेचे अभिनंदन केले. देशातील GDP चा स्थर उंचावत जातोय ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जिथे रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून GDP च्या आकड्यांमध्ये 6.8 टक्के वाढ होईल असा अंदाज लावण्यात आला होता, तिथे देशाच्या GDP ने 7.6 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ही बातमी मोदी सरकार प्रमाणेच संपूर्ण देशासाठी खास ठरली. अनेक संकटांचा सामना करत सुद्धा देशाची आर्थिक स्थिती (Indian Economy) कमालीची कामगिरी करत असल्यामुळे नरेंद्र मोदी यावर भरपूर खुश होते.

शेअर बाजारासाठी देखील अच्छे दिन:

हा आठवडा देशातील शेअर बाजारासाठी अत्यंत लाभदायक ठरला. आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजाराने 4 ट्रिलियन मार्केट कॅपचा आकडा पार केला होता व यामुळेच जागतिक पातळीवर सर्वात मोठ्या पाच स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला पाचवं स्थान मिळालं. यानंतर आपला आनंद द्विगुणीत झाला तो GDP च्या आकड्यांमध्ये झालेल्या सकारात्मक वाढीमुळे. या आठवड्यात निफ्टीने देखील 20291.55 असा नवीन विक्रमी झेंडा गाठला आहे. एका मागून एक येणाऱ्या या आनंदाच्या बातम्या (Indian Economy) मतदानाच्या काळात कार्यरत सरकारसाठी फायदेशीर ठरू शकतात.

औद्योगिक क्षेत्रामध्ये सकारात्मक वाढ:

चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ऑक्टोबर नंतरच्या काळात सलग दुसऱ्यांदा औद्योगिक क्षेत्राने दुहेरी आकडी वाढ नोंदवली आहे. ऑक्टोबरमध्ये या क्षेत्रात 12.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा कोळशाच्या उत्पादनात 18.4%, स्टीलमध्ये 11%, सिमेंटमध्ये 17.1% आणि खताच्या उत्पादनात 5.3% वाढ झाली आहे. तसेच नैसर्गिक वायू 9.9%, रिफायनरी उत्पादनांमध्ये 4.2% आणि कच्च्या तेलात 1.3% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा औद्योगिक क्षेत्रामधल्या प्रमुख आठ घटकांपैकी वीज उत्पादनात 20.3 टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली आहे.