Indian Economy: भारताला टॉप-5 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देण्यात कोणाचा वाट मोलाचा? पंतप्रधान म्हणाले की…

Indian Economy : जगभरात सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेला पाचवे स्थान प्राप्त आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला तिसरे स्थान मिळवण्याचे आहे. मजबूत अर्थव्यवस्था हि भक्कम देशाचा पाय असते. अगदी सोप्या शब्दांत मांडायचं झाल्यास, हातात पैसे असले तरच माणूस प्रगती करू शकतो. त्याप्रमाणेच जर का देशाची संपत्ती वाढली तर आपण अधिकाधिक प्रगती करू शकतो, नवीन प्रकल्पांना चालना देऊ शकतो. कालच्या दिवसाचे महत्व म्हणजे हा दिवस दरवर्षी युवादिन म्हणून देशभरात साजरा केला जातो, कारण हा स्वामी विवेकानंदांचा जयंती दिवस आहे. युवादिनाचे अवचित्य साधून अनेक राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, युवा शक्तीचा सन्मान केला जातो. महाराष्ट्राच्या नाशिक या भागात काल स्वामी विवेकानंदांच्या 161 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मंत्री सामील झाले होते. यावेळी मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं.

Indian Economy बद्दल कार्यक्रमात काय म्हणाले नरेंद्र मोदी?

दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणेच काल नाशिकमध्ये देखील स्वामीजींच्या 161व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 12 जानेवारी हा भारतातील युवाशक्तीचा दिवस आहे. गुलामगिरीच्या काळात ज्या महापुरुषाने भारताला नवीन ऊर्जा दिली त्या स्वामी विवेकानंदांना हा दिवस समर्पित आहे. युवा दिवसानिमित्त नाशिक मध्ये असल्याचा त्यांना आनंद होत असल्याचेही ते म्हणाले व उपस्थितांना युवा दिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात असलेल्या युवा संख्येमुळेच आपण खरोखर बलशाली बनण्याच्या मार्गावर आहोत. हाच मुद्दा पडकून पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला नवनवीन उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम देशातील युवांचे आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जर का टॉप-5 अर्थव्यवस्थांपैकी (Indian Economy) एक बनली असेल तर याचे प्रमुख कारण देशातील युवा वर्गच आहे. सरकारने गेल्यावर दहा वर्षात तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, देशाच्या पंतप्रधांनानी दरम्यान त्यांना युवा पिढीच्या क्षमतेवर ठाम विश्वास असल्याची कबुली दिली होती.

22 जानेवारी पर्यंत स्वच्छ मंदिर उपक्रम:

22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी देशातील सर्वांनी एकत्र येऊन सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवावी असा संदेश काल पंतप्रधानांनी दिला. नाशिक मधल्या काळाराम मंदिराला भेट देऊन मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्याला ते आपले सौभाग्य म्हणाले. सोबतच त्यांनी देशवासीयांना सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर श्रमदान करावे असे आवेदन केले होते.