Indian Economy : भारताच्या अर्थव्यवस्थेत होणार मोठी वाढ; आशिया विकास बँकेचा अंदाज

Indian Economy : भारताची आर्थिक स्थिती उत्तम आहे आणि येणाऱ्या काळात ती आणखीनच प्रगती करून दाखवेल असा विश्वास अनेक आंतराष्ट्रीय एजन्सीज कडून व्यक्त करण्यात आला आहे. यात काही दिवसांपूर्वी देशातील सर्वोच्च बँक म्हणजेच रिझर्व बँकचाही समावेश होता. प्रत्येकाच्या मते भारताची आत्ताची प्रगती पाहता येणारा काळ हा नक्कीच देशासाठी आनंददायी असणार आहे याची खात्री पटते. वेगवेगळ्या एजन्सीजनंतर आता आशिया विकास बँककडून (ADB bank) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल काही अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. या बँकच्या मते चालू आर्थिक वर्षातच भारताची अर्थव्यवस्था 6.7 टक्क्यांच्या अनुषंगाने वाटचाल करत करत आहे, आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल नेमकं काय म्हणते आशिया विकास बँक जाणून घेऊया ….

भारताच्या प्रगतीवर काय म्हणते बँक? (Indian Economy)

बुधवारी आशिया विकास बँकेने माध्यमांसोबत भारताच्या आर्थिक विकासाबाबत चर्चा केली. या चर्चेत बोलताना एकंदरीत बँक भारताच्या अर्थव्यवस्थेप्रती सकारात्मक विचार करीत असल्याचा अंदाज लावला जातोय. मागच्या तीन महिन्यांअगोदर बँकच्या अंदाजानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 6.3 टक्के असा असायला पाहिजे होता. मात्र त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत आलेल्या तेजीमुळे बँकेला आपल्या म्हणण्यात बदल करावे लागले आहेत. आता बाजारातील आकड्यांच्या आधारे बँक म्हणते कि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 7.6 टक्के आहे, तसेच गेल्या सहा महिन्यांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेत 7.7 टक्क्यांच्या आधारे वाढ होताना पाहायला मिळाली आहे.

रिझर्व बँकने लावला होता असा अंदाज:

भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल (Indian Economy) अनेक लोकांनी अंदाज व्यक्त केला होता. मात्र देशाने यानंतर सकारात्मक वाढ केल्यामुळे अनेकांना आपले अंदाज बदलावे लागले आहेत. रिझर्व्ह बँकच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 6.5 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत मजल मारू शकते. बाकी एजन्सीजमध्ये नोमुराने 5.9 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता जो कि आता 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सिटी ग्रुपने आताची परिस्थती लक्ष्यात घेता 6.2 टक्क्यांचा अंदाज बदलून 6.7 टक्के केला आहे.

आशिया विकास बँकेने यंदाच्या वर्षासाठी जरी भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी होण्याची नोंद केलेली असली तरीही आर्थिक वर्ष 2024-25 साठी अजूनही ते 6.7 टक्क्यांचा अंदाज कायम ठेऊन आहेत. आणि यावेळी केवळ भारताच नाही तर बँकने चीन या राष्ट्राची अर्थव्यवस्था 4.9 टक्क्यांवरून 5.2 टक्क्यांपर्यंत झेप घेईल असा अंदाज व्यक्त केला आहे.