Indian Economy : GDP वाढीचा देशातील सर्वसामान्य माणसाला काय फायदा होतो ?

Indian Economy : जगभरातील अनेक देश आत्ताच्या घडीला जरी त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करीत असले तरीही भारत या शर्यतीत उजवा ठरला आहे. 7.6 टक्के GDP सहा भारत इतरांच्या तुलनेत फारच चांगली प्रगती दर्शवित आहे.त्यामुळे प्रगतीशील राष्ट्राला अपेक्षित गरजेच्या घटकांचे पालन करत वावरणारा आपला देश येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जगावर राज्य करेल अशी चिन्हं दिसू लागली आहेत. मोदी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे आपण हळूहळू गरीबीवर मात करतोय, देशाची प्रगती होत आहे पण तुम्हाला माहिती आहे का कि वाढत्या GDP चा सामान्य जनतेवर नेमका परिणाम होतो तरी कसा? वाढती GDP सामान्य जनतेसाठी खरोखरच सकारात्मक बातमी आहे का हे जाणून घेऊया…

वाढत्या GDP चा जनतेला फायदा काय?

GDP वाढल्याने देशात सकारात्मक बदल घडत आहेत, हि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे अश्या अनेक बातम्या आपण वाचतो, पण खरोखरच GDP मध्ये होणारी वाढ याचा आपल्यावर नेमका परिणाम कसा होतो याचा विचार केलात का? अगदीच उलघडून सांगायचं तर GDP वाढल्यामुळे सरकारच्या हातात जास्तीत जास्त पैसा येतो आणि ज्याचा वापर पुढे जात सरकार जनतेच्या सुखासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खर्च करतो. तसेच GDP वाढल्यामुळे देशातील रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत जातात. आत्ता जर का आपल्या देशाच्या GDP चा आकडा पहिला तर जगभरातील प्रमुख देशांच्या तुलनेत आपण चांगली कामगिरी करत आहोत, आणि म्हणूनच हि बातमी आपल्यासाठी सकारात्मक आहे.

GDP चा तुमच्यावर काय परिणाम होईल?

वरती म्हटल्याप्रमाणे GDP वाढल्याने सरकारच्या हातात अधिक पैसा येतो आणि पुढे जात त्याचा वापर देशाच्या विकासासाठी केला जातो. विविध स्तरांवर जगणाऱ्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतात आणि परिणामी जीवन जगण्याचा स्थर उंचावतो. म्हणजेच सरकारप्रमाणे जनतेच्या हातात असलेल्या पैश्यांमध्ये देखील वाढ होते.

आता GDP आणि रोजगार यांचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, तर GDP वाढल्यामुळे देशातील उद्योग तसेच व्यवसायिक क्षेत्रात वाढ होते. या क्षेत्रांमध्ये विकास आणि विस्तार करण्याच्या अधिकाधिक संधी तयार होतात. गुंतवणुकीच्या प्रमाणांमध्ये वाढ होते आणि नोकरीच्या संधी चालून येतात, देशातील बेरोजगारीचा आकडा कमी होतो.

भारतीय अर्थव्यवस्थेने पकडलाय जोर: (Indian Economy)

या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, भारताची अर्थव्यवस्था सध्या कमालीची कामगिरी बजावत आहे. ही परिस्थती कायम राहिली तर भारताचं भविष्य उज्वल आहे. देशातील अनेक बेरोजगारांना आता आशेचा किरण दिसेल, स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली जाईल. सध्या भारत महागाई आणि निर्यातीमुळे उद्भवणाऱ्या संकटांवर कायमचा मार्ग काढण्याच्या तयारीत आहे.

जगभरात सध्या इस्रायल- हमास युद्ध, युक्रेन युद्ध आणि बाकी अनेक संकटांचा परीणाम अनेक देशांवर होताना दितोय, तरीही भारत एक प्रगतीलीशील राष्ट्र असूनही सकारात्मक वाटचाल करत असल्याने त्याची वाहवा केली पाहिजे. काही काळापूर्वी वातावरणातील बदलांमुळे देशाच्या GDPचा आकडा 6.5 टक्क्यांवर येऊन पोहोचला होता मात्र आता तज्ञांच्या मते देशाच्या GDP मध्ये 6.4 ते 7.1 टक्के वार्षिक वाढ (Indian Economy) होऊ शकते.