Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगवान झेप; तिसऱ्या महिन्यात GDP 8.4 टक्के

Indian Economy: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) भारताच्या GDP वाढीचा दर अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे 8.4 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ही वाढ मागील तिमाहीतील 8.1 टक्क्यांच्या वाढीच्या दरापेक्षा जास्ती आहे. RBI ने या कालावधीसाठी 6.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता, तर अर्थशास्त्रज्ञांनी 7.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र या सगळ्यांच्या विरुद्ध GDP तील ही मजबूत वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत आहे.

अर्थशास्त्रज्ञांचे अंदाज चुकले: (Indian Economy)

2023-24 च्या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरांत बदल करण्यात आले होते. पूर्वी 7 टक्के असा अंदाज असलेला दर आता 7.6 टक्के इतका वाढवण्यात होता. अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 6.6 टक्के वेगाने वाढणार होती. मात्र, प्रत्यक्षात हे सर्व अंदाज चुकीचे ठरले.

जगभरात अनेक देश आर्थिक संकटातून जात असताना, भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने विकसित होत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 7.3 टक्के विकास दर अंदाज वर्तवला होता. चीन आणि युरोपमधील अनेक देश मंदीच्या सावटाखाली असताना, भारताने मात्र विकासाचा झंझावात निर्माण केली आहे (Indian Economy). चीनची अर्थव्यवस्था अजूनही मंदगतीने वाढत आहे, तर भारताने त्यांनाही मागे टाकले आहे.