बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या देशभरात भारत चार ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलेल्या चर्चा सुरु आहेत. देशातील आर्थिक घडामोडींना जर का कोणी जबाबदार असेल तर ते अर्थ मंत्रालय, मात्र अजून मंत्रालयाकडून काहीच ठोस बातमी समोर आलेली नसल्यामुळे या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवावा यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र प[प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मात्र ट्विट करत याबाबत देशाचे अभिनंद केलं आहे.
Indian Economy बद्दल काय म्हणतात अधिकारी?
जरी देशभरात चार ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या चर्चा सुरु झाल्या असल्या तरीही अजून अर्थ मंत्राल्लायाकडून या बद्दल कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आणि जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत अश्या माहितीवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे चुकीचे आहे. उच्च पदावरील अधिकारी सांगतात कि अजून देशाने चार ट्रिलियनचा पल्ला गाठलेला नाही आणि तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत आणि संघर्षाची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) डेटावर आधारित सर्व देशांसाठी थेट ट्रॅकिंग GDP फीडमधून एक असत्यापित स्क्रीनग्राब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला, हि पोस्ट शेअर करण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेकांचा समावेश होता. गौतम अदानी X वर पोस्ट लिहितात कि आपल्या देशाने चार ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला गाठला आहे, आणि 4.4 ट्रिलियन डॉलर्सच्या जपान आणि 4.3 ट्रिलियन डॉलर्सच्या जर्मन अर्थव्यवस्थेला आपण मागे टाकलं आहे.
अनेक मोठ्या राजकीय नेत्यांसोबत महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या बातमीला दुजोरा देत म्हटले कि नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली आपण यशस्वी वाटचाल करत असताना अर्थव्यवस्थेने चार ट्रिलियन डॉलर्सचा (Indian Economy) आकडा गाठला आहे, मात्र अजूनही अर्थमंत्रालयाने या बातमीची पुष्टी केलेली नाही.
दरम्यान, 2023-24 च्या एप्रिल-जून या कालावधीत भारताने 7.8 टक्के जीडीपी वाढ नोंदवली, जी गेल्या चार तिमाहीत सर्वाधिक आहे. सेवा क्षेत्रातील दुहेरी अंकी विस्तारामुळे भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. जून तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के असून चीनने याच कालावधीत नोंदवलेल्या 6.3 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.