Indian Economy: भारतातल्या आर्थिक हालचालींना फेब्रुवारीमध्ये चांगली गती मिळाली आहे. HSBC बँकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही महत्वाची गोष्ट समोर आली. या सर्वेक्षणात सेवा आणि उत्पादन क्षेत्रात सुधारणा झाल्याचे नोंदवले आहे. सेवा क्षेत्राचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (PMI) जानेवारीमध्ये 61.8 वरून फेब्रुवारीत 62 पर्यंत वाढला, तर उत्पादन क्षेत्राचा PMI 56.5 वरून 56.7 पर्यंत वाढला आणि एकत्रित PMI हा सात महिन्यांच्या उच्चांकी 61.5 वर पोहोचला आहे. म्हणजेच, भारतातल्या अर्थव्यवस्थेत फेब्रुवारी महिन्यात चांगली वाढ झाली आहे.
भारताची अर्थव्यवस्था दमदार: (Indian Economy)
आजची ही बातमी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल महत्वाची आहे, कारण आपली अर्थव्यवस्था सध्या चांगली स्थितीत असून त्यात दमदार वाढ होत आहे. हा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणाच्या निकालांवर आधारित असून पुढील महिन्यात अधिकृत PMI डेटा जाहीर केला जाईल. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, नवीन निर्याती ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, विशेषत: वस्तू उत्पादकांसाठी. याचा अर्थ असा की, भारतीय कंपन्यांना जास्तीत जास्त परदेशी ऑर्डर्स मिळत आहेत आणि त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढत आहे.
याशिवाय, उत्पादकांनी उत्पादनाच्या किमती वाढविण्याचा दर कमी केला आहे आणि त्यांचा नफा वाढवण्यात यशस्वी झाले आहेत. हे भारतातील अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे कारण याचा अर्थ असा होतो की कंपन्या स्पर्धात्मक राहू शकतात आणि अधिक नफा मिळवू शकतात. पुढील महिन्यात अधिकृत PMI डेटा जाहीर झाल्यानंतर अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक स्पष्ट होईल. परंतु, सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्था चांगल्या मार्गावर आहे(Indian Economy). भारताच्या सेवा क्षेत्राची परिस्थिती बळकट असल्याने येत्या वर्षात देशाचा आर्थिक विकास चांगला होण्याची शक्यता आहे. सरकारने 7% वाढीचा अंदाज व्यक्त केला असून येणाऱ्या काळात भारत जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनू शकते.