Indian Economy: जपान आणि ब्रिटनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था नुकत्याच आर्थिक मंदीच्या चपेटीत अडकल्या आहेत, ज्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जपानमध्ये तर देशाच्या एकूण उत्पन्नात मोठी घट झाली आहे आणि त्यामुळे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे स्थान गमावले आहे. जरी जपान आणि ब्रिटन यांच्यासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था चर्चेत असल्या तरी, हे लक्षात घ्या की जगातील इतर 18 देशांमध्येही आर्थिक मंदीची जोखिम वाढली आहे. म्हणजेच, जगातील अनेक देश सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत आणि त्यांच्या अर्थव्यवस्था कमकुवत होण्याची शक्यता आहे.
जपान आणि ब्रिटनमध्ये मंदीचं सावट: (Indian Economy)
जपान आणि ब्रिटन हे मोठे देश मागच्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या तिमाहीत मंदीच्या कचाट्यात सापडले आहेत. या दोन्ही देशांचा GDP सलग दोन तिमाहीत घटला आहे. जपान आणि ब्रिटन यांच्या मंदीच्या बातम्या चर्चेत असल्या तरी या देशांप्रमाणेच आयर्लंड आणि फिनलंड देखील आता मंदीच्या जबड्यात सापडल्याची बातमी आहे. जपानच्या बाबतीत तर सप्टेंबर तिमाहीत अर्थव्यवस्थेत 3.3 टक्क्यांची घसरण झाली होती, जी डिसेंबर तिमाहीत येऊन 0.4 टक्क्यांपर्यंत कमी झाली. त्याचप्रमाणे, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेतही सप्टेंबर तिमाहीत 0.1 टक्के आणि डिसेंबर तिमाहीत 0.3 टक्क्यांची घट झाली आहे.
जपान, ब्रिटन, आयर्लंड आणि फिनलंड हे चार देश सलग दोन तिमाहीत आर्थिक संकुचन झाल्यामुळे अधिकृतपणे आर्थिक मंदीत असल्याचे जाहीर झाले आहे. मात्र, जगभरातील अनेक देशांनी अद्याप चौथ्या तिमाहीच्या आर्थिक परिणामांची घोषणा केलेली नाही. म्हणून सध्या केवळ या चार देशांनाच मंदीत असल्याचे म्हणता येईल.
भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल थोडक्यात:
जागतिक स्थरावर इतर देश जरी कठीण परिस्थितीचा सामना करत असले तरीही, भारताची अर्थव्यवस्था वाढतच आहे (Indian Economy). जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या संस्थांनी भारताचे कौतुक केले असून ते जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे मानले आहे. भारताच्या प्रमुख रेटिंग एजन्सींच्या (Rating Agency) अंदाजानुसार भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, मात्र दरम्यान जागतिक परिस्थितीचा भारतावर होणारा परिणाम नाकारता येणार नाही.