Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक बँक सकारात्मक; वाढीचा अंदाज 7.5 टक्के

Indian Economy: जागतिक बँकेने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठा खुलासा केला आहे. या अगोदर देखील अनेक वित्तीय संस्था आणि जागतिक बँकेने देखील भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत काही अंदाज लावले होते, नक्कीच ते अंदाज साकारात्मक देखील होते. मात्र यावेळी भारतीयांनी खुश व्हायला हरकत नाही कारण गेल्या वेळी बांधलेल्या अंदाजापेक्षा यावेळचे आकडे बऱ्यापैकी जास्त आहेत, म्हणजेच यावेळी जगातून बँकेने 7.5 टक्के दराने अर्थव्यवस्था वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भारताची अर्थव्यवस्था सकारात्मक: (Indian Economy)

जागतिक बँकेने सादर केलेले आकडे सांगत की फक्त भारतच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियाची अर्थव्यवस्था सध्या सकारात्मक दिशेने वाढत आहे. दक्षिण आशियाच्या सर्व देशांमध्ये भारतासोबत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या अर्थव्यवस्थेतही सुधारणा होणार असल्याचा अंदाज असल्याने वर्ष 2024 मध्ये दक्षिण आशियाच्या अर्थव्यवस्थेचा वाढदर 6 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. भारताच्या बाबतीत तर हा वाढदर 7.5 टक्के इतका असण्याचा अंदाज आहे.

एवढाच नाही तर यापुढील वर्षात म्हणजेच 2025 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढदर 6.6 टक्के इतका असण्याची शक्यता असल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. सेवा आणि उद्योग क्षेत्रात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच उत्पादन आणि रिअलएस्टेट क्षेत्रातही वाढ दिसून येईल, असं त्यांचं मत आहे.

जागतिक बँकेने भारताच्या वाढीचा वेग रोखण्यासाठी अडथळेण ठरू शकणाऱ्या आव्हानांकडे इशारा दिला आहे. या अडथळ्यांमुळे विविध क्षेत्राचा कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्याचा परिणाम रोजगाराच्या संधी आणि इतर गोष्टींवर होऊ शकतो. जरी inflation ( महागाई) कमी होण्याची शक्यता असली तरी,सरकारचा अर्थसंकल्पीय तूट आणि सरकारी कर्ज कमी होण्याचीही अपेक्षा आहे. हे केंद्र सरकारच्या मजबूत उत्पादन वाढीमुळे शक्य होणार आहे.

एप्रिलमध्ये पहिली धोरणात्मक घोषणा:

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 5 एप्रिल रोजी चालू आर्थिक वर्षासाठी पहिली धोरणात्मक घोषणा करणार आहे, यावेळी RBI GDP वाढ आणि किरकोळ महागाईवरील अंदाज प्रस्तुत करेल(Indian Economy). अधिकृत आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत 8.4 टक्के आणि 2024 च्या आर्थिक वर्षात 7.6 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे.