Indian Economy : जगभरातील अनेक अर्थव्यवस्था सध्या कठीणाईचा सामना करत आहेत. कित्येक देशांची अर्थव्यवस्था कमकुवत बनत चालली आहे, आणि या परिस्थतीला जर का कोणी सर्वात जास्ती जबाबदार असेल तर ती म्हणजे कोविडची महामारी. ही महामारी संपली असली तरीही जगात असे कित्येक देश आहेत जे त्यावेळी झालेल्या नुकसानीतून अजूनही डोकं वर काढू शकलेले नाहीत. अश्या कठीण काळात आपल्याला घाबरण्याची काहीही गरज नाही, कारण आपल्या देशाचीअर्थव्यवस्था आजही चांगली कामगिरी करून दाखवत आहे. सरकारी आकडे सांगतात कि चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रात देशाची GDP 7.6 टक्क्यांवर कायम आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामगिरीवर अत्यंत खुश आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे आकडे आपली भक्कम अर्थव्यवस्थाच दर्शवितात.
भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ: (Indian Economy)
आताच्या घडीला जागतिक स्तरावर इतर देश त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न करत असताना, आपला भारत देश सकारात्मक कामगिरी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले कि, “चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी करून दाखवली आहे, आणि दिवसेंदिवस या आकड्यांमध्ये अधिक सुधारणा होताना दिसते. याचाच अर्थ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनत आहे”. सरकारच्या आकडेवारीनुसार उत्पादन,खाणकाम आणि सेवा क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था 7.6 टक्के वाढली आहे आणि आत्ताच्या काळात हीच सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे.
नरेंद्र मोदी वाढत्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत खुश आहेत. याबद्दल मत व्यक्त करण्यासाठी त्यांनी X चा वापर केला. इथे पोस्ट शेअर करत ते म्हणतात कि जागतिक स्तरावर चालेल्या अश्या कठीण काळात, आपल्या देशाने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. यावरूनच आपल्या देशातील अर्थव्यवस्थेची (Indian Economy) लवचिकता आणि ताकद दिसून येते. येणाऱ्या काळात अधिकाधिक रोजगाराच्या संधी तयार करत, लवकरात लवकर गरीबीला देशातून कायमचे निष्कासित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
रोजगार मेळाव्यात काय म्हणाले पंतप्रधान?
याआधी देखील एका रोजगारात मेळाव्यात जनसमुहासोबत बोलत असताना पंतप्रधान म्हणाले होते कि सरकारी धोरणे आणि निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेने एक वेगळीच उंची गाठली आहे. देशात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत तसेच कित्येक लोकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. याच्याच परीणामार्थी वर्ष 2047 पर्यंत आपण विकसित राष्ट्राचे स्वप्न (Indian Economy) पूर्ण करू यात काहीही शंका नाही. सदर मेळाव्यात नरेंद मोदी यांच्या हातून 51 हजार पेक्षा अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले होते.
वर्ष 2014 पूर्वी भारतीय समाज मुलभूत सुविधांपासून वंचित राहिला होता. त्यानंतर मोदी सरकारला देशाचा विकास करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आजपर्यंत सोयी सुविधांपासून वंचित राहिलेल्या समाजाला आधार देण्यातूनच विकासाच्या कामाला गती दिली . समाजातील वंचित समाजाला मदतीचा हात दिला. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या वंचित समाजाला सरकारी योजनांचा लाभ घेण्याची एकही संधी मिळाली नव्हती, त्या सर्व गरजू आणि पिडीत समाजापर्यंत पोहोचण्यात मोदी सरकार यशस्वी झाले आहे.
देशाचा विकास होण्याचे प्रमुख कारण बदलेले सरकार आणि विचारसरणीतील बदल आहेत. कार्य करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा झाल्याने देशात अनेक सकारात्मक बदल घडलेले पाहायला मिळतात. 13 कोटींपेक्षा अधिक जनता गरीब परिस्थितीमधून बाहेर पडली आहे. सरकारी धोरणे आणि निर्णय यांच्याच परिणामाने आज आपली अर्थव्यवस्था (Indian Economy) उच्च शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे, जगातील अनेक मोठमोठ्या कंपन्या आपल्या या अभूतपूर्व कामगिरीवर खुश आहेत असेही ते म्हणाले.