Indian Economy : लवकरच भारत बनणार जागतिक लीडर; अमेरिका- चीनला टाकणार मागे

Indian Economy : भारताची अर्थव्यवस्था जोमाने वाढत आहे हे आपण सगळेच जाणतो. GDP च्या दरांमध्ये झालेली वाढ हि आपल्यासाठी महत्वाची बातमी ठरली होती. यामुळे आता देशात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे, आणि म्हणूनच वर्ष 2047 मध्ये 5 ट्रिलीयनचा आकडा गाठण्याचे पंतप्रधानांचे उदिष्ट त्याआधीच पूर्ण होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. तुम्हाला माहिती आहे का केवळ देशातच नाही तर विदेशातील अनेक तज्ञांनी भारतीय बाजारपेठेत सकारात्मक वाढ होत असल्याची माहिती दिली आहे. येणाऱ्या काही दिवसांतच भारत लीडर बनून जगावर राज्य करेल यात आता शंका वाटत नाही. देशाची हि प्रगती पाहता चीन नाही तर भारत संपूर्ण आशिया खंडात विकासाचा किरण बनून चमकणार आहे.

भारत करणार जगावर राज्य : (Indian Economy)

असं म्हणतात कि परिस्थिती कितीही बिकट असली तरीही त्यावर मात करण्याची मानसिकता माणसाला सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देते. आपल्या देशाच्या बाबतीत हाच गुण लागू होतो. अनेक संकटांचा सामना आपण करतोय, जगभरात महागाई दिवसेंदिवस वाढत असली तरीही आपण अश्या बिकट परिस्थितीतही प्रगती करत आहोत, जगातील इतर देशांप्रमाणे सर्व बाबतीत आपण परिपूर्ण नाही. आजही जगात भारत प्रगतीशील देश म्हणूनच ओळखला जातो. तरीही भारताकडून घेतली जाणारी मेहनत आणि स्वत:च्या क्षमतेवर असलेला दृढ विश्वास असल्यामुळे आपण हि गोष्ट शक्य करून दाखवू शकत आहोत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत भारतात विकासाचा (Indian Economy) दर 6.3 टक्के होता, तिथेच अमेरिका सारख्या बलाढ्य अर्थव्यवस्था त्यांची आर्थिक परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करीत होत्या.

IMF च्या म्हणण्यानुसार काही काळात अमेरिका, चीन सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांची गती मंदावू शकते. चीन या देशाचा GDP 8 टक्के, अमेरिकेचा GDP 5.1 टक्के असू शकते आणि याचवेळी भारताचा विकासदर 11.5 टक्क्यांचा पल्ला देखील गाठू शकतो. याचाच अर्थ असा कि केवळ भक्कम अर्थव्यवस्थेच्या जोरावर येणाऱ्या काळात भारत संपूर्ण जगावर राज्य करू शकण्याची चिन्हं दिसत आहेत. भारत अधिकांश प्रमाणात मोबाईल फोन, वाहने यांसाठी इतर देशावर अवलंबून नाही. तसेच छोट्यातल्या छोट्या बाजारात सुद्धा “Vocal For Local” म्हणत आपण परदेशी मालापेक्षा देशी मालाला जास्ती महत्व द्यायला सुरुवात केली आहे, म्हणूनच येणाऱ्या काही दिवसांत चीन-अमेरिकेला मागे टाकणं भारतासाठी (Indian Economy) कठीण काम नाही.