Indian Economy : गेल्या काही दिवसांपासून भारतात होणाऱ्या आर्थिक वाढीची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. जगभरातील मोठमोठाले देश त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना, भारत मात्र सातत्याने प्रगतीचा मार्ग कायम धरून आहे. भारताकडून दर्शवण्यात आलेल्या या प्रगतीच्या अनुसार लवकरच भारत जगभरातील मोठ्याला देशांना मागे टाकत सर्वोच्च पद प्राप्त करेल असा विश्वास अनेक तज्ञ कडून व्यक्त केला जातोय. प्रत्येक भारतीय नागरिकाला आत्ताच्या घडीला वर्ष 2047 पर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा पल्ला गाठायचा आहे, आणि अशा परिस्थितीत जगभरातून मिळणारी कौतुकाची थाप ही आपल्याला दिवसेंदिवस याच प्रगतीच्या मार्गावर चालण्यास प्रेरणा देत आहे. सध्या वर्ष 2032 पर्यंत भारत जपान आणि जर्मनी यांसारख्या देशांना मागे टाकत जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशा चर्चा केल्या जात आहेत. नेमकी काय आहे एकूण परिस्थिती जाणून घेऊया…
2032 पर्यंत भारत होणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था: (Indian Economy)
भारताच्या अर्थव्यवस्थेत आलेली तेजी पाहता अनेक तज्ञ आपल्या देशाच्या भविष्याबद्दल काही अंदाज व्यक्त करत आहेत. सध्या 2032 पर्यंत भारत जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत. सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च या संस्थेच्या मते भारताचा GDP हा चीन पेक्षा 90 टक्क्यांनी अधिक असेल तर अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी (India GDP) 30 टक्क्यांनी अधिक असणार आहे. या संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2023 ते 2028 या ५ वर्षात भारत 6.5 टक्क्यांनी विकासाचा जोर पकडेल. ज्याच्या परिणामी 2032 पर्यंत आपण सहजपणे जपान आणि जर्मनी या देशांना मागे सारत जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. अश्याप्रकारे जर का भारताच्या प्रगतीचा दर दिवसेंदिवस वाढत गेला तर 2080 नंतर भारत चीन आणि अमेरिका यांसारख्या बलाढ्य देशांना सुद्धा मागे टाकण्यात कमी पडणार नाही.
देशातील तरुण आहेत सर्वात मोठी ताकद:
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताला मिळालेली तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे हा भारताच्या आर्थिक वाढीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा बिंदू मानला जातोय. आपल्या देशातील सर्वाधिक जनसंख्या ही मध्यमवर्गीय आहे, देशभरातील परिस्थिती ओळखून आपण केलेल्या महत्त्वाच्या बदलांमुळे हीच मध्यमवर्गीय जनसंख्या सकारात्मक वाढ करवण्यात अर्थव्यवस्थेची मदत करत आहे (Indian Economy). आणि वाढती जागतिक आर्थिक एकात्मता यामुळे आर्थिक विकासाला गती देण्यात मोठा हातभार लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अभ्यासात म्हटले आहे की येणाऱ्या काळात भारत स्वतःला गरिबी, असमानता इत्यादी कमी करण्यात सक्षम बनणार आहे . भांडवल आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह पर्यावरणाशी संबंधित आव्हानांवर आपण लक्ष्य दिले पाहिजे.
यापूर्वी जुलै 2023 मध्ये, जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने म्हटले होते की 2075 पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते (Indian Economy). जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था मोठी झेप घेईल. तसेच भारत अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल आणि चीननंतरची दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे या अहवालात म्हटले आहे. गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की 2075 पर्यंत चीन 57 ट्रिलियन डॉलर्सच्या आकारमानासह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली असेल, तर भारत 52.5 ट्रिलियन डॉलर्सच्या आकारासह दुसऱ्या स्थानावर पाहायला मिळेल आणि 51.5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह अमेरिकन तिसऱ्या क्रमांकावर असेल.