Indian Economy : 2047 पूर्वीच भारत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा पूर्ण करेल; केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Indian Economy : भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस सुधारत आहे. हल्लीच GDP चा आकडा सुधारत असण्याची बातमी समोर आली होती. याचाच अर्थ असा कि येणाऱ्या काळात देशात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, ज्यांमुळे गरीबीचा आकडा कमी होईल आणि प्रगतीशील भारताला गती मिळेल. आजच देशाचे केंद्रीय राज्यमंत्री (वित्त) पंकज चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे 5 ट्रिलियनचे स्वप्न भारत नक्कीच पूर्ण करून दाखवेल असा विश्वास व्यक्त केला आहे, मात्र यासाठी 2047 पर्यंत थांबण्याची गरज नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत गाठणार 5 ट्रिलियनचा पल्ला: (Indian Economy)

भारत सध्या जगाच्या पाठीवर राज्य करत सर्वात मजबूत अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चाललेली हि वाटचाल 2047 पर्यंत यशाचा पल्ला नक्कीच गाठेल असा विश्वास प्रत्येकालाच वाटत आहे. आत्ताचा आकडा पहिला तर भारताचा GDP 3.7 ट्रिलियन डॉलर्सवर कायम आहे आणि येणाऱ्या काळात तो 5 ट्रिलियनचा आकडा गाठेल यात कोणतीही शंका नाही. जगभरातील अनेक मोठमोठ्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार 2027-28 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) हि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे, मात्र पंकज चौधरी यांच्या म्हणण्यानुसार भारत ज्या गतीने प्रगती करत आहे ते पाहता आपण हे लक्ष्य वेळेच्या आतच पूर्ण करू.

पंकज चौधरी काय म्हणाले?

पंकज चौधरी यांच्या म्हणण्यानुसार भारतीय रुपया दिवसेंदिवस अधिकाधिक मजबूत बनत चालला आहे, आणि 5 ट्रिलियनचे स्वप्न गाठण्यासाठी हा सर्वात मोठा आणि सकारात्मक घटक ठरणार आहे. रुपयाला मिळालेली स्थिरता आपल्या फायद्याची आहे. वर्ष 1980 -81मध्ये आपली अर्थव्यवस्था केवळ 189 अरब डॉलर्स एवढी किरकोळ मात्र होती, जिथे पुढे जात 2010-11 पर्यंत सकारात्मक वाढ व्हायला सुरुवात झाली, तेव्हा 1.71 ट्रिलियन डॉलर्स असलेली अर्थव्यवस्था आज 2.67 ट्रिलियन डॉलर्सवर येऊन पोहोचलेली आहे. त्यांच्या मते भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) बाजारी घटकांवर आधारित असून यात देश तसेच विदेशातील वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश होतो.