Indian Market Today: आज सकाळी बाजार उघडताच शेअर बाजारात जोरदार घसरण झाली, आठवड्याच्या सुरुवातीची हीच खासियत असते म्हणा. Sensex 124 अंकांनी खाली आला तर Nifty 31 अंकांनी घसरला. अनेक दिवसांपासून संकटांचा सामना करीत असलेल्या Paytmच्या शेअरमध्ये आज पुन्हा घसरण झाली. आजपासून देशात सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना (SGBS) 2023-24 च्या चौथ्या सीरिजची सुरुवात झाली आहे. तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. SGBS ही भारता सरकारची योजना आहे जी तुम्हाला सोने खरेदी करण्याची आणि ते डिजिटल स्वरूपात ठेवण्याची सुविधा देते.
आज नजर फिरवावी अश्या गोष्टी: (Indian Market Today)
अनिल अग्रवाल यांच्या मालकीची वेदांता लिमिटेड कंपनी आपले व्यवसाय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागण्याची योजना आखत आहे. कंपनी Aluminum सह आपले प्रमुख व्यवसाय वेगवेगळ्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि या प्रक्रियेसाठी 9 ते 12 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज वर्तवला गेलाय.
जसं की आपल्याला माहितीच आहे Paytm कंपनी आत्ताच्या घडायला अनेक संकटांचा सामना करत आहे, आणि अश्यातच डायरेक्टर मंजू अग्रवाल यांनी कंपनीला रामराम ठोकला असल्याने त्यांच्या चिंता आणखीन वाढल्या आहेत (Indian Market Today), असं म्हणतात की सर्वोच्य बँकने दिलेल्या निर्णयानंतर अग्रवाल यांनी हा निर्णर जाहीर केला.
तुम्ही जर का सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. आजपासून सरकारची गोल्ड बॉन्ड योजना सुरू झाली असून, याच सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना (Sovereign Gold Bond Scheme) 2023-24 सीरीज-4 मध्ये 12 ते 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेसाठी इश्यू प्राइस 6,263 रुपये प्रति ग्राम ठरवण्यात आला आहे, ज्यात तुम्ही Online आणि Offline अश्या दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता.