Indian Passport : विविध क्षेत्रांमध्ये या नवीन वर्षात आपण कमालीची कामगिरी करून दाखवली. यामध्ये आता देशातील पासपोर्टचे नाव देखील सामील झाले, कारण आता पुन्हा एकदा भारतीय पासपोर्टने जगाच्या पाठीवर एक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. आता जगभरातील देशांच्या यादीत भारताने तीन पट लांब उडी घेतलेली असून सध्या भारतीय पासपोर्ट जगभरातील देशांच्या तुलनेत 80व्या स्थानावर आहे. याचाच अर्थ असा की भारताचा पासपोर्ट हा जगभरातील 80वा सर्वात बलशाली पासपोर्ट असणार आहे. पासपोर्टने केलेल्या या नवीन कामगिरीमुळे आता पासपोर्ट धारकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. यानंतर देशातील पासपोर्ट धारक काही विशेष देशांमध्ये बिना व्हिसाजचे ये-जा करू शकतील. हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या नवीन अहवालानुसार हि बातमी सादर करण्यात आली आहे. खुशखबर म्हणजे आता भारतीय पासपोर्ट धारक 62 देशांमध्ये व्हिजाशिवाय ये- जा करू शकणार असून यामध्ये भूतान, ब्रिटिश वर्जन आयलँड, बार्बाडोस, थायलंड, जॉर्डन, मलेशिया, श्रीलंका, मॉरिशस आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे.
‘या’ देशांमध्ये भारतीयांना मिळते विजा ऑन अरायव्हलची सुविधा: (Indian Passport)
जगभरात काही देश असेही आहेत जिथे प्रवास करण्यासाठी भारतीयांवर विजा ऑन अरायव्हल या कायद्याचे पालन करावे लागते. या देशांमध्ये कम्बोडिया, इंडोनेशिया, लाओस, म्यामां, तिमुर-लेस्टे, ईरान, बोलीविया, बुरुंडी, केप वेर्डे आइलैंड्स, कोमोरो आइलैंड्स, जिबूती, गाबोन, मेडागास्कर, सेशेल्स, मॉरिटेनिया, मोजाम्बिक, सिएरा लियोन, सोमालिया, समोआ, तंजानिया आणि जिम्बाब्वेसह इतर देश सामील आहेत. यापूर्वी भारत पासपोर्टच्या यादीत 83 व्या स्थानावर होता. मात्र 2024 मध्ये पासपोर्टच्या बाबतीत आपल्याला आनंदाची बातमी मिळाली असून आपण हेनली पासपोर्ट इंडेक्स या यादीत भूटान जॉर्डन व्हिएतनाम मंगोलिया ताजकिस्तान मेडागास्कर यांसारख्या देशांना मागे टाकले आहे.
जगभरात सर्वात ताकवान पासपोर्ट कोणाचा?
जर जगाच्या यादीत भारताचा (Indian Passport) नंबर 80वा असेल तर जगभरात सर्वात ताकद्वान पासपोर्ट कुठल्या देशाचा आहे? फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन हे देश पासपोर्टचा बाबतीत सर्वात आघाडीवर आहेत आणि त्यांच्या याच शक्तिशाली प्रदर्शनामुळे ते व्हिजाशिवाय जगभरातील 194 देशांमध्ये प्रवास करू शकतात. या देशांनंतर फिनलैंड, स्वीडन आणि दक्षिण कोरियाला स्थान प्राप्त असल्यामुळे हे देश 193 विविध देशांमध्ये व्हिजाशिवाय ये-जा करू शकतात. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रिया, डेनमार्क, आयरलैंड आणि नीदरलैंड हे चार देश जगभरातील 192 देशांमध्ये प्रवास करू शकतात.
शेवटी जगभरातले सर्वात कमकुवत पासपोर्ट कोणाचे याची माहिती आहे का? काही देश बलवान असले तरी दुसऱ्या बाजूला काही देश मात्र अद्यापही कमकुवत आहेत. ज्यामध्ये डोमिनिका, हौती, कतार शिवाय इतर देशांचा समावेश होतो. तसेच आपल्या शेजारचे राष्ट्र म्हणजेच पाकिस्तान ह्याचा पासपोर्ट जगभरातील चौथा सर्वात मोठा कमकुवत पासपोर्ट आहे आणि याच्यासोबतच इराक सिरिया आणि अफगाणिस्तान यांचे पासपोर्ट देखील कमकुवत समजले जातात.