Indian Philanthropist Woman: पेश्याने पत्रकार असलेल्या ‘या’ महिलेने केले 170 कोटी रुपयांचे दान

Indian Philanthropist Woman: देश विदेशात जशी सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी तयार करतात त्याचप्रमाणे सर्वात मोठ्या दानशूर व्यक्तींची यादी देखील प्रसिद्ध केली जाते. अलीकडेच हुरूनकडून अशीच एक यादी तयार करण्यात आली आहे आणि यात HCL चे संस्थापक शिव नाडर यांचे नाव सर्वात आधी आहे पान या यादीत अजून एका महिलेचा समावेश असून त्या इन्फोसिस या कंपनीचे सह- संस्थापक नंदन निलकेणी यांची पत्नी रोहिणी निलकेणी आहेत. आता यांचे नाव यादीत का व या नेमक्या कोण आहेत हे आज जाणून घेऊया..

भारतातील दानशूर महिला: Indian Philanthropist Woman

संपूर्ण जगाबद्दल बोलायचं झालं तर बिल गेट्स हे कधीच दान करायला मागे पुढे बघत नाहीत. पण त्यांच्याप्रमाणे काही व्यक्ती आपल्या देशात देखील आहेत आणि त्यांच्या मधल्याच एका महिलेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. देशातील श्रीमंत आणि दानशूर व्यक्ती म्हटलं कि आपोआपच आपण शिव नाडर, गौतम अदानी, मुकेश अमाब्नी अशी नावं पटापट सांगून टाकू पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात यांच्याव्यतिरिक्त देखील काही माणसं अशी आहेत जी आपल्या जवळ असेलली संपत्ती गरजवंतांना दान करतात.

हुरून इंडियाचा अहवाल सांगतो कि रोहिणी निलकेणी या भारतातील सर्वात दानशूर महिला आहेत. आपल्या पती प्रमाणेच त्या स्वतः देखील समाजकार्य आणि परोपकार करताना दिसतात. रोहिणी यांनी मागच्या आर्थिक वर्षात सर्वात अधिक रक्कम दान म्हणून दिली आहे, आणि हि रक्कम साधी नसून तब्बल 170 कोटी रुपये आहे.

कोण आहेत रोहिणी निलकेणी?

नंदण निलकेणी यांच्या पती रोहिणी निलकेणी(Indian Philanthropist Woman) या पत्रकार आहेत आणि त्या स्वतः एक NGO चालवतात. त्यांचा हा NGO शिक्षण, आरोग्य, पाणी आणि स्वच्छता या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. मुंबईत वाढलेल्या रोहिणी यांनी हि रक्कम शिक्षणा संबंधित कामांसाठी दान केली आहे. त्या सध्या 63 वर्षायांच्या असून कामाच्या क्षेत्रात त्यांचा जोर फार चांगला आहे, रोहिणी यांचे पती देखील समाजकार्यात इच्छुक असतात आणि त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 189 कोटी रुपये समाजकल्याणासाठी दान दिले होते.