Indian Railways : आपल्यापैकी अनेकजण आजही रेल्वेने प्रवास करतो. आणि रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या वस्तू त्याच MRP च्या दरापेक्षा अधिक किमतीत विकल्या जात आहेत म्हणून कुढत बसत तक्रार करतो. आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत कि एखादा दुकानदार जर का रेल्वे स्टेशनवर महाग वस्तू विकत असतील तर याविरुद्ध तक्रार कशी करता येईल. त्याधी जाणून घेऊया कि MRP म्हणजे काय, देशात विकली जाणारी प्रत्येक वस्तू एका विशिष्ट किमतीने विकली जाते ज्याला मेक्सिमाम रिटेल प्राईज असं म्हटलं जातं. मात्र जर का कुणी अश्या MRP चं उल्लंघन करत वस्तू महाग किमतीने विकत असतील तर हा एक गुन्हा समजला जातो.
रेल्वे स्टेशनवर विकल्या जातायत महाग वस्तू: (Indian Railways)
रेल्वेचा डबा (Indian Railways) वेळेत पकडणं म्हणजे एक कसरतच म्हणावी लागेल. आणि अश्या घाई-गडबडीत आपण एखादी वस्तू विकत घेतली तर ती योग्य दरात विकली जात आहे कि नाही हे पडताळून पाहणं देखील विसरून जातो आणि याचाच फायदा तिथले दुकानदार घेत असतात.आणि परिणामार्थी रेल्वे स्टेशनवर अनेक वेळा साधी पाण्याची बाटली सुद्धा बाजारी किमतींपेक्षा रक्कम वाढवून विकली जाते.
या विरुद्ध तक्रार कशी कराल?
भारत सरकारने प्रत्येक गुन्हा पकडण्यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे. त्याच प्रमाणे रेल्वेच्या प्रवाश्यांना कोणत्याही परिस्थतीत त्रास होऊ नये म्हणून 139 असं हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे. तुम्हाला रेल्वेच्या बापतीत कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही या नंबरशी संपर्क साधू शकता. तांत्रिक दृष्ट्या विकसित होत असलेल्या भारतात जवळपास सर्वच गोष्टींसाठी विशिष्ठ एपची तरतूद करण्यात येते तसाच एक एप रेल्वे खात्याने प्रवाश्यांच्या सोयीसाठी तयार केला आहे याच ‘रेल मदद’ एपचा वापर करून तुम्ही मदत मिळवू शकता.
मात्र सरकारी कामांमध्ये नेहमीच उशीर होतो असं विचार करत तक्रार नोंदवणं मागे घेऊ नका. विश्वास ठेवा हा हेल्पलाईन नंबर वेळेत आणि योग्य ती मदत तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि बनवलेला app देखील काही अश्याच प्रकारे काम करतो, त्यामुळे निश्चिंत राहा आणि झालेल्या गुन्ह्याची तक्रार नोंदवा. मात्र तक्रार नोंदवताना तुम्हाला दुकानदाराचे नाव, त्याच्या दुकानाचे नाव, स्टेशनचे नाव, दुकानाचा नंबर इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती असणे अनिवार्य आहे. त्यामुळे सरकारी कामकाजांवर विश्वास ठेवा आणि वेळेत तक्रार नोंदवत गुन्हेगारी प्रवृतीला आळा घाला.