Indian Share Market: 10 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जवळपास 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले होते आणि या भाषणात त्यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. या विधानावर अनेक विरोधकांनी टीका केली आणि सरकार निर्गुंतवणुकीवर भर देत आहे असा आरोप केला. तरीही पंतप्रधानांनी भाषणात सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आणि त्यावर असेही म्हटले की, “हे माझं वचन आहे की, गुंतवणूकदारांना नुकसान होणार नाही.”
पंतप्रधानांचं भाकीत खरं ठरतंय का? (Indian Share Market)
गेल्या सहा महिन्यातील शेअर बाजाराचा आढावा घेतल्यास, याच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. पूर्वी गुंतवणूकदार ज्या सरकारी कंपन्यांकडे दुर्लक्ष करत होते, त्याच कंपन्या आज सर्वात पुढे पोहोचल्या आहेत. लोकांना असे वाटत होते की या कंपन्या बंद होतील, पण पंतप्रधान मोदी यांनी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आणि आज त्यांच्या या सल्ल्यावर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगलेच फायदे मिळाले आहेत.
कोणत्या कंपन्या देत आहेत भरगोस परतावा?
LIC आणि HAL या दोन सरकारी कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत गेल्या सहा महिन्यात लक्षणीय बदल झाला आहे. LIC चा शेअर 655 रुपयांवरून 1029 रुपयांवर पोहोचला, तर HALचा शेअर 240 रुपयांवरून 382 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ LIC ने गुंतवणूकदारांना 57 टक्क्यांचा परतावा दिला, तर HALने गुंतवणूकदारांना 59 टक्क्यांचा परतावा दिला आहे. दुसरी कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने पण गुंतवणूकादारांना मालामाल केले. गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 56.37 टक्के जोरदार रिटर्न दिला आहे.
मागच्या 6 महिन्यांत, 56 सरकारी कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत 66 टक्क्यांची वाढ झाली व यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 23.7 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला (Indian Share Market). रेल्वे विकास निगम, MMTC, NDMC, सेंट्रल बँक, युको बँक, इरकॉन आणि NHPC यांच्यासह इतर 56 कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.