Indian Space Economy | 23 ऑगस्टला ISRO ने भारताचा झेंडा थेट चंद्रावर फडकवला. चंद्रायान-३ (Chandrayan-3) चंद्राच्या साउथ पोल( South Pole) वर यशस्वीपणे उतरलं. हा दिवस भारतासाठी फारच महत्वाचा होता. ISRO च्या वैद्यानिकांची मेहनत या दिवशी अखेरीस फळाला आली. प्रत्येक देशवासियांसाठी हा दिवस खास होता. Chandrayan- 2 च्या अपयाशासोमोर झुकून न जाता ही मोहीम आपल्या वैद्यानिकांनी यशस्वी करून दाखवली आहे . ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आता ISRO ची ख्याती वाढलेली आहे, विशेष लक्ष देण्याची बाब म्हणजे कमी खर्चात ही मोहीम फत्ते करणारा भारत हा एकमेव देश आहे.
भारताकडून केली जात आहे अजून प्रगती करण्याची अपेक्षा
चंद्रयान-३ च्या भव्य यशानंतर आत्ता संपूर्ण जग भारताकडून अधिकाधिक प्रगती करण्याची अपेक्षा करत आहे. संपूर्ण विश्वाच्या इतिहासात, सर्वात कमी खर्चात म्हणजेच 615 कोटी रूपयात चंद्राच्या South Pole वर पोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. भारताच्या नावे रुजू झालेला हा नवीन विक्रम आहे. उपग्रहावर आपले यान यशस्वीपणे पाठवल्यानंतर भारताचा अंतराळात मोहीम आखण्याचा Success Rate 95% झाला आहे. याशिवाय भारताकडे अनेक सेटलाइट लॉंच करण्याची क्षमता आहे, व यामुळे येणाऱ्या काळात भारत हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
2040 पर्यंत भारताची Space Economy 8 लाख करोड पर्यंत जाईल (Indian Space Economy)
मल्टीनेशनल मेनेज्मेंट कन्सल्टंनसी, आर्थर डी लिटील ( Multinational Management Consultancy, Arthur D. Little) यांच्या अहवालानुसार वर्ष 2040 पर्यंत भारताची स्पेस एकॉनोमी 8 लाख करोडचा पल्ला गाठेल. आत्ता सध्याच्या स्थितीत ती 66, 440 करोड रुपये एवढी आहे. याचाच अर्थ असा की येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला ह्यात 1150 % वाढ झालेली पाहायला मिळू शकते.
मागच्या काही वर्षात भारताच्या स्पेस सेटअप( Space Setup) मध्ये 28 % वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी स्पेस सेटअप( Space Setup)ने 990 करोड रुपयांचा फंड जमा केला होता. भारताच्या स्पेस इकॉनॉमी(space economy) ला बढावा देण्यासाठी भारत सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असतो. वर्ष 2016 -17 मध्ये भारताचं स्पेस इकॉनॉमी बजेट 7510 करोड रुपये होतं, ज्यात वाढ करवत वर्ष 2023 मध्ये 12543 करोड रुपये करण्यात आलं आहे.