Indian Stock Market: भारतीय बाजार 4 ट्रिलियनच्या क्लबमध्ये सामील; चीनला देईल का टक्कर?

Indian Stock Market: भारतीय शेअर बाजार सध्या उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा वाढत आहे. गेल्या काही दिवसांत, BSE आणि NSE दोन्ही प्रमुख बाजारपेठा 4 ट्रिलियन क्लबमध्ये सामील झाल्या याचाच अर्थ असा की भारतीय बाजाराचा जागतिक बाजारातील स्थर वाढला आहे. या तेजीमुळे, भारतीय बाजार येत्या काही दिवसांत नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. आज सकाळी बाजार तेजीने सुरू झाला आणि Sensexने 72,500 अंकाचा टप्पा ओलांडला, तर Niftyने 46,000 अंकाचा टप्पा पार केला.

भारतीय शेअर बाजाराचा विक्रमी पराक्रम: (Indian Stock Market)

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी गेल्या 12 महिन्यात इतर बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त पैसे कमवले आहेत. MSCI इंडिया इंडेक्सने गेल्या एका वर्षात 28 टक्क्यांचा परतावा दिला आहे, तर जागतिक बाजारपेठेतील MSCIEM इंडेक्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली आहे.

नोव्हेंबर 2023 च्या अखेरीस, भारतीय शेअर बाजारातील एकूण गुंतवणुकीचे मूल्य (Market Cap) 4 ट्रिलियन डॉलर ओलांडून पुढे गेले होते. आता पुन्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) चे Market Cap ही 4 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. याचा अर्थ असा की भारतीय शेअर बाजार आता 4 ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये मजबूतपणे स्थापित झालाय. याचबरोबर, भारतीय शेअर बाजारने हाँगकॉग शेअर बाजाराला मागे टाकत जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार बनण्याचा विक्रमही केलाय. हे भारतासाठी एक मोठे यश ठरले असून यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संकेत मिळतात.

आता भारतीय बाजार देणार चीनला टक्कर?

काही वर्षपूर्वी परदेशी गुंतवणूकदार चीनमध्ये गुंतवणूक करायला प्राधान्य देत होते. चीनमधील मोठ्या बाजारपेठेमुळे अनेक गुंतवणूकदार आकर्षित होत होते, पण कोविड महामारीनंतर जगाचा आणि गुंतवणूकदारांचा चीनवरील विश्वास डळमळीत झाला. आत्ताच्या घडीला चीनमध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांना धोकादायक वाटत आहे (Indian Stock Market), त्यामुळे ते आता भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतील अशी अशा वाटते.