Indian Stock Market: शेअर बाजार हे गुंतवणुकीचं नवीन साधन आहे, अनेक जणं शेअर बाजारावर विश्वास ठेवायला लागले आहेत, मात्र Smallcap आणि Midcap बद्दल सुरु असलेल्या चर्चांमध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय शेअर बाजाराबद्दल कौतुकास्पद शब्द उच्चरले. त्या म्हणाल्या की कितीही चढ उत्तरांना सामोरं जावं लागत असलं तरीही भारतीय शेअर बाजार स्थिरता कायम ठेऊन आहे, इथं सुरु असलेला व्यवहार संतुलित आहे.
शेअर बाजाराबद्दल काय म्हणाल्या अर्थमंत्री?(Indian Stock Market)
जसं आपण सगळेच जाणतो की आजकाल गुंतवणुकीचे प्रकार बदलत आहेत आणि बऱ्याच प्रमाणात लोकं शेअर बाजाराकडे वळत आहेत, आणि स्वाभाविकपणे बाजारावर देखील हा विश्वास कायम ठेवणे ही एक मोठी जबाबदारीच असते असं म्हणावं लागेल. बाजार म्हटलं म्हणजे त्यात चढ उतार हे आलेच, कोणीही दरवेळी नफ्यात राहू शकत नाही. मात्र आपला विश्वास महत्वाचा असतो आणि आज तोच विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दाखवला.
सीतारामन म्हणाल्या की आपल्या बाजारावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे, जागतिक स्थरावर कितीही प्रश्न असले तरीही आपला बाजार स्थिरपणे कामगिरी बजावत आहे(Indian Stock Market). भारतीय बाजारपेठेवर गुंतवणूकदारांनी ठेवलेला विश्वास हा नकीच यशस्वी ठरेल असेही त्या म्हणाल्या त्यामुळे घाबरून जाणायची गरज नाही. आता लोक म्युच्युअल फंडाच्या सोबतच थेट डिमॅट खाते उघडून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. इतकेच नाही, तर बचत योजनांऐवजी शेअर बाजारात पैसा लावण्याच्या बाबतीत भारत जागतिक स्थरावर आघाडीवर आहेत.