Indigo Price Hike : आपल्यापैकी अनेकांना विमान प्रवास करण्याची इच्छा असते. विमान प्रवासाचे आकर्षण हे नेहमीच इतर प्रवास प्रवास माध्यमांपेक्षा अधिकच असते. मात्र बाजारपेठेतील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या Indigo ने आपल्या ग्राहक वर्गाला एक मोठा झटका दिला आहे. इंडिगोला नेहमीच आपण सर्वसामान्यांची विमान कंपनी म्हणून ओळखतो, या विमान कंपनीकडून विशेषतः सर्वसामान्यांसाठीच परवडणाऱ्या दरात तिकिटांचे शुल्क आकारले जाते. मात्र आज या कंपनीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार काही निवडक आसानांसाठी तिकिटांची रक्कम वाढवण्याचा निर्णय पक्का करण्यात आला आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वी हवाई इंधन शुल्कात 4 टक्क्यांची घट झाल्यामुळे कंपनीने 4 जानेवारी 2024 रोजी विमान प्रवास सोयीस्कर बनवत तिकिटांची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण दोन दिवसांपूर्वी कंपनीने विमान प्रवासादरम्यान काही आसनाच्या बाबतीत हा निर्णय बदलला असून आता प्रवाशांना एक ठराविक आसनावर बसण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे भरावे लागणार आहेत.
आता Indigo आकारणार अतिरिक्त शुल्क: (Indigo Price Hike)
कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार प्रवाशांना समोरच्या बाजूच्या आसनावर बसण्यासाठी अधिक भाडे द्यावे लागणार आहे. समोरच्या सीटची खासियत काय असते?? विमानांमध्ये समोरच्या बाजूला लेग रूम सह XL (Extra Large) सीट दिली जाते. XL सीटमध्ये 34″ आसन पिच असते, तर नियमित सीटची पिच ही 31″ असते. मात्र रुंदी ही सर्व आसनांसाठी समान असल्याने कदाचित ते सारखे दिसतात. XL सीट मध्ये दिल्या जाणाऱ्या याच सवलतीमुळे विमानप्रवाशांना आता अतिरिक्त शुल्क (Indigo Price Hike) द्यावे लागणार आहे. A320 किंवा A32neo विमानातील 180 किंवा 18६ पैकी 18 सीट्स ही XL सीट्स असतात. आता या जागांची इच्छा मनात धरणाऱ्या प्रवाश्यांना 2000 रुपये अतिरिक्त भाडे भरावे लागणार आहे. तसेच पुढच्या मधल्या सीट वरून प्रवास करण्यासाठी 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडे आकारले जाईल.
Indigo ने विमान प्रवास स्वस्त केला होता:
काही दिवसांपूर्वीच इंधनाच्या किमतीमध्ये कपास झाल्याने 4 जानेवारी 2024 रोजी इंडिगो या विमान कंपनीने इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला होता. 1 जानेवारी 2024 पासून हवाई इंधनाच्या किमतीमध्ये 4 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमतीमध्ये सवलत दिल्याने विमान कंपनीने देखील प्रवाशांना खुशखबर दिली होती. इंडिगोच्या निर्णयानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंडिगोचे भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी झाले आहे. मात्र आता सवलतींचा लाभ घेऊन प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाश्यांना अतिरिक्त शुल्क भरून (Indigo Price Hike) प्रवास करणे भाग असणार आहे.