Indus Store : गुगल-प्ले स्टोरला आपण जगभरातील apps साठी भरावलेला बाजार असे म्हणू शकतो. कारण इथे तुम्हाला जगातील कानाकोपऱ्यामधून विविध प्रकारचे apps सामावलेले पाहायला मिळतील. तुमच्या इच्छे आणि गरजेनुसार हवा तो app तुम्ही डाउनलोड करू शकता. अगदी गेमिंगपासून ते दैनंदिन व्यवहाराचे गणित जपण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्ले-स्टोरवर apps पाहायला मिळतील. आज पर्यंत गुगल-प्ले स्टोर सारखं अजून प्लेटफॉर्म बनलं नाहीच का? तर अगदीच असं नाही. पण प्ले स्टोरला टक्कर देणारा एकही प्लेटफॉर्म नसल्यामुळे कोणीही त्यांच्या समोर टिकाव धरून राहू शकलं नाही. आता मात्र गुगल- प्ले स्टोरला जबरदस्त टक्कर देण्यासाठी लवकरच एक नवीन स्टोर बाजारात येणार आहे, हे स्टोर कोणतं जाणून घेऊया…
बाजारात येणारं नवीन स्टोर कोणतं (Indus Store)?
गुगल-प्ले स्टोरला भली मोठी टक्कर देऊ शकण्याची ताकद असलेलं एक स्टोर बाजारात आलेलं आहे. या नवीन स्पर्धाकामुळे गुगलची सत्ता धोक्यात येऊ शकते. आता हा प्रतिस्पर्धी निर्माण केलाय तरी कोणी? तर फोन-पे या कंपनीने. फोन-पे हि कंपनी ग्राहकांसाठी नवीन सुविधा घेऊन आली आहे आणि या नवीन स्टोरचं नाव इंडस (Indus Store) असं सांगितलं जातंय. गुगल-प्ले स्टोर अनेक दिवसांपासून बाजारात ग्राहकांना सेवा पुरवतो, त्यामुळे अधिकांश ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यसाठी गुगल यशस्वी झालं आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का गुगल-प्ले स्टोर apps सूचीबद्ध करण्यासाठी मनमानी शुल्क आकारतो, म्हणूनच अनेक app बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा फायदा घेताच फोन-पे नवीन app स्टोर (Indus Store) घेऊन बाजारात उतरलाय जे भारतीय बजारपेठेत लवकरात लवकर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाईल.
कसा असेल Indus App स्टोर?
आपण ज्याप्रमाणे गुगल-प्ले स्टोरवरून वेगवेगळे apps डाउनलोड करायचो अगदी त्याच प्रमाणे तुम्ही इथून देखील नव-नवीन apps डाउनलोड करू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या एका वर्षासाठी इथे देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा या विनामुल्या असणार आहेत. तसेच हे नवीन app स्टोर जवळपास 12 भारतीय भाष्यांमध्ये व्यव्यहार करू शकणार आहे. या नवीन आणि अनोख्या सुविधांमुळे अनेक ग्राहक प्ले स्टोरला मागे टाकत या app स्टोरकडे (Indus Store) वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान हे नवीन app स्टोर वापरकर्त्यांना गेमिंगचे विविध पर्याय उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून ते घरबसल्या आरामात गेमिंगची मजा घेऊ शकतात आणि या नवीन स्टोरवर (Indus Store) डेव्हलपर्सकडून कमी फी वसूल केली जात असल्याचा दावा गुगलने केलाय.