Inflation In India : आपल्या देशात महागाईचा दरारा अजूनही कायम आहे.आपला देश मध्यमवर्गीय लोकांचा असल्यामुळे महागाईचा मोठा फटका सामान्य जनतेला बसतो. महागाईचा दर थोडासा कमी झालेला असला तरीही पूर्णपणे हे सावट सरलेलं नाही त्यामुळे लगेच आनंदून जात कोणतेही निर्णय घेणे योग्य नाही. देशाची सर्वोच्य बँक असलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. वाढत्या महागाईवर काय म्हणतात शक्तीकांत दास जाणून घेऊया…
महागाईपासून सावध राहा: गव्हर्नर (Inflation In India)
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाई पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हा धोका अजून सरलेला नसून बँक याबद्दल सतर्क राहिली असून सध्याच्या मार्केट परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. किरकोळ महागाईच्या दृष्टीनेही महत्वाची पाऊले बँककडून उचलली जाणार आहेत तसेच महागाई कमी करणे हेच आता आमचे प्रमुख उदिष्ट असेल.असे शक्तिकांत दास यांनी म्हंटल. भारतात तसेच जगातील अनेक देशांमध्ये खाद्यपदार्थांची महागाई हा चिंतेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी आपण महाग कांदे आणि टोमेटो यांसारख्या समस्यांचा सामना केला होता.
आजूबाजूला चालेल्या पर्यावरणातील बदलांचा वाईट परिणाम पिकांवर होत असल्याने त्यांच्या किमतींमध्ये बदल झालेले पाहायला मिळतात, आणि महागाई वाढत जाते. ऑक्टोबरमध्ये खाद्य पदार्थांची महागाई 6.24% वर कायम होती. महागाईच्या समस्येवर गव्हर्नारांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा इशारा दिला आहे. त्यामुळे हा विषय किती गंभीर असू शकतो यांची कल्पना आत्तापर्यंत तुम्हाला आली असेलच (Inflation In India).
सप्टेंबर महिन्यातील महागाईच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या होत्या, आणि म्हणून भारतातील किरकोळ महागाईचा (Retail Inflation) दर तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 5.02% वर आला. ऑक्टोबरमध्ये ग्राहक महागाई( Consumer Inflation) 4.87% च्या लक्ष्याजवळ पोहोचली आहे, जी चार महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. रिझर्व बँकेने गेल्या चार बैठकांमध्ये धोरणात्मक दरात कोणताही बदल केला नाही. वर्ष 2023-24 मध्ये सरासरी महागाईचा दर 5.4 टक्के आहे जो गेल्या आर्थिक वर्षातील महागाई दरापेक्षा कमी म्हणावा लागेल.