Inflation : महागाईचा फटका नोकऱ्यांना!! अनेक तरुणांनी धरली व्यवसायाची वाट

Inflation: जगभरात कोरोना महामारी येऊन गेली आणि जगण्याची अनेक प्रकारे हानी झाली. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीकोनातून इथे बघायचं झालं तर कित्येक लोकांनी आपल्या चांगल्या नोकऱ्या गमावल्या होत्या. आता कोरोनाचे सावट टळले असले तरीही अनेक देश यातून सावरले नाहीत व त्यांच्या आर्थिक व्यवस्थांवर याचा परिणाम दिसून येतो. वाढत्या महागाईमुळे खर्च भागवणे कठीण झाले आहे, व म्हणून अनेक लोकं नवीन आणि चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. तर अनेकजण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत.

अनेकांची मनं व्यवसायाकडे:

वाढता खर्च आणि हातातून निसटत जाणाऱ्या नोकऱ्या यांमुळे चिंतीत लोकं मोठ्या प्रमाणात व्यवसायांकडे वळत आहेत. PWCचा रिपोर्ट सांगतो कि जगातील 26% लोकं आजकाल व्यवसायाकडे वळत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे (Inflation) हातात असलेल्या पैश्यांनी घरखर्च भागवणे किंवा EMI भरणे आता सगळ्यांसाठीच शक्य नाही. या रिपोर्टमध्ये PWC ब्रिटेनचं उदाहरण देऊन सांगतो कि तिथे 47% कर्मचाऱ्यांचं असं म्हणण आहे कि महिन्याच्या शेवटी त्यांच्या हातात काहीच रक्कम बाकी उरत नाही, आणि म्हणून काही बचत सुद्धा करायचा मार्ग नसतो. पुढे रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे कि 15% कर्मचारी महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे न उरल्यामुळे त्रस्त आहेत. आणि म्हणून ते व्यवसायाकडे वळताना दिसतात.

भारताला आहे Inflation चा धोका:

जगात ग्रीन एनर्जीची वाढ होत आहे, आणि याचा वाईट परिणाम म्हणजे यांमुळे नोकरदारांना नोकऱ्या गमावण्याची भीती आहे. भारतातील कित्येक लोकं आजही खाण उद्योगात काम करतात, आणि म्हणूनच असा अंदाज लावला जातोय कि वर्ष 2035 पर्यंत कोळसा उद्योगातून सुमारे 45 लाख नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे, म्हणजेच जगभरातून 100 लोकं बेरोजगार होतील. ग्लोबल एनर्जीचा अहवाल सांगतो कि येणाऱ्या काळात कोल इंडियामधून 73 हजार 800 नोकऱ्या गमावल्या जातील तर कोळसा उद्योगात 37% घसरण होईल.