Infosys Deal : Infosys हि IT कंपनी आपल्या देशातील दुसरी सर्वात अधिक नावाजलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. परंतु आता वर्ष संपत असतानाच या कंपनीला एक मोठा धक्का बसला आहे. देशातील युवकांनी दर आठवड्याला किमान 70 तास काम केले पाहिजे असे म्हणणाऱ्या नारायण मूर्ती यांच्या Infosys कंपनीचा मोठा करार अचानक फसल्यामुळे वर्षाअखेरीस Infosys ला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. तीन महिन्यांपूर्वी कंपनीने हा करार केला होता आणि अचानक करार मोडल्यामुळे कंपनीला तब्बल 12,500 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. नेमकं काय आहे एकूण प्रकरण जाणून घेऊया!!
इन्फोसिसचा 12,500 कोटींचा करार मोडला : (Infosys Deal)
आम्ही आज ज्या कराराबाबत (Infosys Deal) सांगत आहोत तो करार तब्बल 12,500 कोटींचा होता. Infosys ने AI शी संबंधित हा करार केला होता. सप्टेंबर महिन्यात हा करार कऱण्यात आला होता मात्र आता कंपनीने हा करार संपुष्टात आल्याची माहिती दिली आहे. यामुळे Infosys चे मोठं नुकसान झालं आहे. सप्टेंबर 2023 मध्ये झालेला हा करार पुढच्या एकूण 15 वर्षांसाठी वैध ठरला असता तर या करारांतर्गत इन्फोसिस आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका जागतिक कंपनीला डिजिटल एक्स्पीरियंस आणि AI सोल्युशन्सचा पुरवठा करणार होती. तसेच हा दर्जेदार करार झाल्याने कंपनीला भरपूर नफा मिळत होता, मात्र केवळ तीन महिन्यातच हा करार संपुष्टात आल्याने कंपनीमध्ये निराशाजनक वातावरण पसरले आहे.
कशी आहे कंपनीची एकूण स्थिती?
गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीचे माजी CEO निरंजन रॉय यांनी यांनी कंपनीचा अचानक राजीनामा दिला, आणि परिणामी कंपनीमध्ये खळबळ उडाली होती. आता कंपनीने जागतिक स्तरावर केलेला करार (Infosys Deal) मधेच फिस्कटल्यामुळे वातावरण अजूनच बिघडले आहे. नारायण मूर्ती यांच्या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 6,212 कोटी रुपयांची कमाई केली होती, तसेच त्यांच्या नफ्यात 3 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली. आत्ताच्या घडीला Infosys या कंपनीचे एकूण मार्केट भांडवल 6.46 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे.