Infosys Devidend : Infosys ने जाहीर केला Devidend; अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांच्या संपत्तीत 138 कोटींची वाढ

Infosys Devidend । IT क्षेत्रातील नावाजलेली कंपनी म्हणजे इन्फोसिस, मूर्ती कुटुंबाच्या मालकीच्या या कंपनीने आपल्या शेअर होल्डर साठी (Stakeholders) लाभांश (Devidend) जाहीर केला आहे. आणि हा लाभांश जाहीर केल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान यांची पत्नी आणि मूर्ती कुटुंबाची लेक अक्षता मूर्ती यांच्या संपतीत सुमारे 138 कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. इन्फोसिस कंपनी FY24 साठी 18 रुपये प्रति इक्विटीने आपला लाभांश जाहीर करणार आहे.यासाठी 25 हि तारीख रेकोर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे तर पेमेंटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 अशी ठरवण्यात आली आहे.

Infosys मध्ये अक्षता मूर्ती यांची मोठी भागेदारी: Infosys Devidend

इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती यांची लेक अक्षता मूर्ती यांची कंपनीमध्ये मोठी भागेदारी आहे, मूर्ती कुटुंबाचे जावई आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी शुनक यांच्याजवळ इन्फोसिसचे एकूण 3,89,57,096 एवढे शेअर्स आहेत, याचाच अर्थ असा कि अक्षता मूर्ती यांच्याजवळ कंपनीचा 1.05 टक्के हिस्सा आहे आणि आता 18 रुपये प्रती शेअर लाभांश जाहीर झाल्यानंतर त्यांची संपत्ती 70 कोटी रुपयांनी वाढली आहे. जून 2023 मध्ये 17.50 रुपये प्रती शेअर असा लाभांश जाहीर झाल्यानंतर अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

Infosys चा पेआउट कधी होणार?

प्रति शेअर 18 रुपयांचा लाभांश निश्चित झाल्यानंतर सगळ्यांच्या नजर पेआउटकडे वळल्या आहेत. इन्फोसिस कंपनीकडून 25 ऑक्टोबर हि तारीख लाभांशाच्या नोंदणीसाठी देण्यात आली आहे, तर 6 नोव्हेंबर 2023 हि तारीख पेआउटसाठी निश्चित करणात आली आहे. अक्षता मूर्ती यांचा इन्फोसिसमध्ये मोठा वाटा असल्यामुळे कंपनी जेव्हा जेव्हा लाभांश जाहीर (Infosys Devidend) करते तेव्हा त्यांच्या संपत्तीत वाढ होते.