Infosys चा कर्मचाऱ्यांना नवा आदेश; आता Work From Home होणार बंद

Infosys: कोविडच्या काळापासून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम(Work From Home) म्हणजेच घरून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही अनुकूल अशी ही संधी असल्यामुळे एकत्रितपणे दोन्हीही पक्षांकडून याचा स्वीकार करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील काही कंपन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचा आदेश देत आहेत. इन्फोसिस हि भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे, या कंपनीचे मालक म्हणजेच नारायण मूर्ती यांनी केलेल्या कामाच्या तासांबद्दच्या वक्तव्यामुळे ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. अशातच आता त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करायला सांगितले आहे. काय आहे एकूण बातमी थोडक्यात पाहूयात….

नारायण मूर्तींनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवलं: (Infosys)

इन्फोसिस कंपनीकडून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे. कंपनीचे मालक नारायण मूर्ती यांनी उत्पादकता आणि आर्थिक वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान 70 तास करण्याची गरज आहे असे वारंवार सांगितल्यानंतर स्वतः इन्फोसिस कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं होतं पण याला कोणत्याही कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. कोविड नंतर आता तीन वर्ष उलटून गेली आहेत, आणि आता प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरून काम करणं कदाचित जास्त सोयीस्कर वाटत असावं. मात्र इन्फोसिस या कंपनीच्या मालकाचं म्हणजेच नारायण मूर्ती यांचं मत आपण सर्वच जाणतो, त्यामुळे इन्फोसिसच्या(Infosys) कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याशिवाय इतर कोणताही पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही.

Wipro आणि Tata यांनी देखील दिला कर्मचाऱ्यांना इशारा:

देशातील या मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा ऑफिसमध्ये येऊन काम करायला सांगत आहेत. कोविडच्या काळात बदललेलं कामाचं हे स्वरूप पुन्हा एकदा पूर्ववत होईल का? असा प्रश्न आता निर्माण झालाय. Wipro या कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास सांगितलं होतं आणि असे न केल्यास विपरीत परिणामांना सामोरे जावं लागू शकतं असा इशाराही दिला होता.

केवळ इन्फोसिस (Infosys) आणि विप्रोच नाही तर टाटा या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने देखील आता कर्मचाऱ्यांना Work From Home ला रामराम करत ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. टाटा कंपनीकडून कर्मचारी वर्गाला आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करणं अनिवार्य करण्यात आलंय. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आपण Work From Home या स्वरूपात काम करत आहोत, देशाअंतर्गत काम करणाऱ्या अनेक छोट्या कंपन्यांनी आधीच आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितलं होतं आणि आता यात Wipro, Infosys यांसारख्या मोठ्या कंपन्यांची नावे देखील ऍड झाली आहेत.