Infosys Hiring : नोकरभरती बाबत Infosys चा मोठा निर्णय; जागतिक मंदीचे संकेत?

Infosys Hiring : कालच आपण Infosys च्या लाभांशाबद्दल आपण मोठी बातमी पहिली. मूर्ती दांपत्याची लेक अक्षता मूर्ती यांच्या संपतीमध्ये यामुळे भरपूर वाढ होणार आहे. यानंतर Infosys या देशातील मोठ्या IT कंपनीने नवीन अधिकाऱ्यांच्या भरतीवर रोख लावला आहे.याचाच अर्थ असा कि यंदाच्या वर्षी कंपनीकडून केम्पास प्लेसमेंटसाठी कोणतीही योजना बनवण्यात आलेली नाही. कंपनीचे CFO निरंजन रॉय यांनी माहिती दिली आहे कि यावर्षी कंपनी प्लेसमेंन्ट होणार नाहीत.

Infosys का करणार नाही नवीन भरती? Infosys Hiring

इन्फोसिस कंपनीकडून आलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारी आहेत, आणि आजूबाजूचे वातावरण बघता अजून नवीन अधिकारी आणण्याची गरज त्यांना वाटत नाही. लक्ष्यात घेण्याची गोष्ट म्हणजे इन्फोसिस हि देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे, व या कंपनीकडून नवीन अधिकारी निवडण्याचा कोणताही उद्देश नसल्यामुळे कदाचित या क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या अनेक तरुणांना वाट पहावी लागणार आहे. Infosys Hiring

खरंतर इन्फोसिस कंपनीतून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा कमी करण्यात आला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचा आकडा 7,530 ने कमी झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीने 50,000 फ्रेशर्सची नियुक्ती केली होती. हा आकडा एवढा मोठा आहे कारण तेव्हा कंपनीची तेवढी गरज होती, मात्र यंदा मंदीमुळे चित्र बदलेलं आहे.

IT कंपन्यांची स्थिती काय?

भारतात अभियांत्रिकीची पदवी मिळवून अनेक विद्यार्थी उत्तम संधीच्या शोधात असतात. देशातील अनेक IT कंपन्या त्यांची भरती सुद्धा करवून घेतात मात्र आता अमेरिकेत सुरु असेलेल्या मंदीमुळे नवीन लोकांना कामावर घेण्याबद्दल विचार केला जात आहे, देशात नवीन कला आणि कौशल्य असलेल्या युवकांची संख्या अधिक असताना सुद्धा IT कंपन्याच्या या अवघड निर्णयामुळे त्यांना वाट बघण्यावाचून पर्याय नाही.