Infosys : कोरोना काळापासून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घर बसल्या काम करण्याची सोय (Work From Home) उपलब्ध करून देत आहेत. घरून काम हि संकल्पना कंपनी तसेच कर्मचारी दोघांच्या फायद्याचीच आहे. कारण इथे ऑफिसला जाण्याची घाई नसते तुमच्या घरात बसून, आरामात टास्क पूर्ण करू शकता आणि कर्मचारी कमी असल्यामुळे कंपनीला जास्तीत जास्ती खर्च करावा लागत नाही. पण आता प्रसिद्ध IT कंपनी Infosys ने आपल्या काही कर्मचाऱ्यांना परत कामावर रुजू होण्याचा आदेश दिला आहे.
इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना परत बोलावलं : Infosys
इन्फोसिस या प्रसिद्ध IT कंपनीने आपल्या काही कर्मचाऱ्यांना परत कामावर रुजू होण्याचा आदेश दिला आहे. यात काही mid-level managers, project heads, and entry-level employees यांचा समावेश होतो. या कर्मचाऱ्यांना आता महिन्यातून कमीत कमी १० दिवसांसाठी ऑफिस मधून काम करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलावणारी Infosys हि एकमेव कंपनी नाही तर इतर कंपन्या देखील आपल्या काही कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिस मधून काम करायला सांगत आहेत, यात विशेष म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसीसचा (TCS) समावेश आहे.
यावर कंपनीचे CEO सलील पारीख म्हणाले कि काही कामं अशी असतात जिथे पूर्ण गटाने सोबत राहून त्या गरजा पूर्ण करण महत्वाचं असल्यामुळे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ते घरून काम करणे या संकल्पनेशी अगदीच सहमत आहेत असेही ते म्हणले. त्यामुळे आता इथून पुढे Infosys च्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मधून काम करावं लागणार आहे. तसेच वर्क फ्रॉम होम बंद होणार त्यादिशेने वाटचाल सुरु झाली का? असाही प्रश्न निर्माण झाला.