Inshorts Success Story: बातमी वाचायची आहे पण वेळ नाही; अश्यावेळी समोर येणाऱ्या Inshortsची गोष्ट माहिती आहे का?

Inshorts Success Story: जगात माहिती आणि बातम्यांची सुनामी उसळली आहे. सगळीकडे बातम्या, व्हिडिओ, आणि फोटो झपाट्याने वाहत राहतात. यातून एक गोष्ट समजण्यापूर्वीच दुसरी गोष्ट डोळ्यासमोर येते. त्यातूनच आजकाल Instagram Reels आणि YouTube Shorts सारख्या छोट्या छोट्या मनोरंजनाच्या गोष्टींना लोकप्रियता मिळाली आहे. थोड्या वेळात भरपूर माहिती देणं आणि लगेच पुढची गोष्ट दाखवणं हा त्यांचा ट्रेंड आहे.

आजकाल अधिक वेळ बसून वाचायला, समजायला कुणाजवळ वेळ नाही, त्यामुळे थोड्यातच वेळात भरपूर माहिती देण्याऱ्याच्या शोधात आपण असतो. आणि अश्यावेळी डोळ्यासमोर येतो Inshorts! अल्प वेळात, कमी शब्दांत महत्त्वाची बातमी देणारा एप. जिथे आपण झटकन वाचून, दिवसाच्या घडामोडींशी अपडेट राहू शकतो.

Inshorts ची सुरुवात कोणी केली? (Inshorts Success Story)

आपल्यापर्यंत महत्वाची माहिती अगदी थोडक्यात पण वेळेत पोहोचवायचं काम केलं अझहर इकबाल यांनी, मात्र कसं हे आज जाणून घेऊया. अझर यांच्या आयुष्याची सुरुवात जिज्ञासेत आणि माहिती मिळवण्याच्या तळमळीने झाली, ज्याने त्यांच्या प्रवासाचा पाया रचला. अझहर स्वतः बिहारचा माणूस आहे आणि गणित आणि संगणक शास्त्राची पदवी मिळवण्यासाठी IIT दिल्ली येथे प्रवेश मिळवला होतात. कॉलेज जीवनाची वाटचाल सुरु असताना त्यांची ज्ञानाची भूक आणि त्याच्यात असलेली उद्योजकतेची जन्मजात भावना फुलू लागली आणि लवकरच, त्यांनी आज कोट्यवधी डॉलर्सचा व्यवसाय असलेला सह-संस्थापक बनण्यासाठी IIT कडे पाठ फिरवली.

लक्ष्यात घ्या माहिती किंवा बातमी ही शक्ती आहे आणि ती सर्वांसाठी सहजपणे उपलब्ध करणे हा त्यांचा दृढनिश्चय होता. त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली की, माहिती मिळवण्यासाठी वाचन करणे हा एकमेव मार्ग नाही. म्हणूनच, त्यांनी एक अशी प्लॅटफॉर्म तयार केली जिथे लोकं कमी वेळेत महत्त्वाची माहिती मिळवू शकतात. आणि म्हणूनच, Inshorts चा जन्म(Inshorts Success Story) झाला.

ही एक अशी संस्था जी माहिती आणि वृत्तसंस्थेला नवीन रूप देऊन सर्वांसाठी ती सुलभ करते. Inshorts केवळ एक कंपनीची गोष्ट नाही तर जिज्ञासा, जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर स्वप्नांची पूर्तता करण्याची प्रेरणादायक कहाणी आहे. डिसेम्बर 2014 मध्ये जेव्हा या कंपनीची सुरुवात झाली, तेव्हा Inshorts चे वापरकर्ते होते फक्त 1 लाख. पण आज, ही संख्या वाढून जवळजवळ 30 लाखांपर्यंत पोहोचली आहे. सध्या अझहर इकबाल हे शार्क टॅंक इंडियाचे भाग बनले आहेत, आणि स्वतःप्रमाणेच व्यवसाय करू पाहणाऱ्यांची मदतीचा हात पुढे करत आहेत.