Satya Nadella यांच्या Microsoft च्या CEO पदापर्यंच्या प्रवासासंबंधित काही रंजक गोष्टी

बिझनेसनामा । मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Microsoft CEO) सत्या नडेला हे एक भारतीय वंशाचे अमेरिकन बिझनेस एक्सिकेटीव्ह आहेत. सत्या यांना 2019 मध्ये फायनान्शिअल टाइम्स पर्सन ऑफ द ईयर ही पदवी देण्यात आली. त्याच वेळी, त्यांना सन 2020 मध्ये ग्लोबल इंडियन बिझिनेस आयकॉन देखील देण्यात आला आहे. नडेला यांचा जन्म 19 ऑगस्ट 1967 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बुक्कापुरम नडेला युगंधर आणि आईचे नाव प्रभाती युगंधर असे आहे. तसेच त्यांच्या पत्नीचे नाव अनुपमा नडेला असे आहे.

करिअर कसे घडले ???

मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. येथे त्यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन’ आणि ‘बूथ स्कूल ऑफ बिझिनेस’ यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण पूर्ण केले. मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाल्यानंतर नडेला यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

नडेला यांना मिळणारा पगार

2018-19 मध्ये सत्या नडेला यांचे वार्षिक उत्पन्न 66 टक्क्यांनी वाढून 4.29 कोटी डॉलर्स (304.59 कोटी रुपये) झाले. त्याचवेळी मायक्रोसॉफ्टचे आर्थिक निकाल खूप चांगले मिळाले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार असे म्हटले जाते की नडेला यांचे वेतन 23 लाख डॉलर्स (16.33 कोटी रुपये) आहे. त्यांना मिळणारे बहुतांश उत्पन्न हे शेअर्सद्वारे आहे. हे लक्षात घ्या कि, या शेअर्सद्वारे त्यांनी 2.96 कोटी डॉलर्स (210.16 कोटी रुपये) कमावले,तर 1.07 कोटी डॉलर्स (75.97 कोटी रुपये) शेअर न मिळालेल्या प्रोत्साहन योजनेतून मिळाले. तसेच उर्वरित इतर कामांमधून त्यांना 1,11,000 डॉलर्स (78.81 कोटी रुपये) मिळाले.

सत्या नडेला यांच्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी

सत्या नडेला यांना क्रिकेट खूप आवडते. त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात या खेळातूनच प्रेरणा मिळावली आहे.
फिटनेस बाबतीत ते खूपच उत्साही आहेत तसेच त्यांना रनिंग करणे आवडते.
ते गोड पदार्थांचे शौकीन आहेत आणि खासकरून पेस्ट्रीज खूप आवडतात.
ते स्वत: ला आयुष्यभर शिकणारा म्हणवतात आणि आपल्या फावल्या वेळेत ऑनलाइन क्लासेस घेतात.
मायक्रोसॉफ्टच्या या सीईओला आपल्या मोकळ्या वेळेत कवितांचे वाचण करणे आवडते. त्यांनी कवितेची तुलना कोडींगशी केली आहे.
सिएटल येथे राहणारा व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ सीहॉक्सचे ते एक प्रचंड चाहते आहेत.
जेव्हा नडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनले तेव्हा बिल गेट्स त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मायक्रोसॉफ्टमध्ये परत आले.
1980 च्या दशकाच्या सुरुवातीला हैदराबाद येथील पब्लिक स्कूलमध्ये दहावीत शिकत असताना त्यांची आपल्या पत्नीची पहिल्यांदा भेट झाली.

अशा प्रकारे बनले मायक्रोसॉफ्टचे सीईओ

मायक्रोसॉफ्ट फर्मला क्लाऊड कम्प्यूटिंगमध्ये डेव्हलपमेंट सुचवणाऱ्या काही मोजक्या कर्मचार्‍यांपैकी नडेला हे एक होते. अखेरीस कंपनीने आपला वेळ आणि संसाधने या तंत्रज्ञानासाठी खर्च केली. सत्या यांना नंतर ‘ऑनलाईन सर्व्हिसेस डिव्हिजन सेक्शन’शी संबंधित डेवलपमेंट रिसर्च अँड डेवलपमेंट ’विभाग नियंत्रित करण्याची जबाबदारी देण्यात आली तसेच त्यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही नेमणूक करण्यात आली. 2007 मध्ये ते या विभागात रुजू झाले आणि पुढील चार वर्षे त्याचा एक भाग राहिले.

यानंतर नडेला मायक्रोसॉफ्टच्या सिस्टिम्स अँड टूल्स डिव्हिजनमध्ये गेले आणि त्याचबरोबर त्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूकही झाली. यावेळी सत्या यांना मायक्रोसॉफ्टचा भाग म्हणून 7.9 मिलियन डॉलर्सचे शेअर्स देण्यात आले आणि त्यांना दरवर्षी 700,000 डॉलर्स पगारही मिळतो. या फर्ममध्ये 22 वर्षांच्या कालावधीत काम केल्यानंतर, नडेला यांना 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदावर बढती देण्यात आली. 2017 मध्ये, सत्या नडेला यांचे ‘हिट रिफ्रेश’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांचे जीवन, मायक्रोसॉफ्ट आणि तंत्रज्ञानाचे जग कसे बदलत आहे याविषयी सांगितले गेले आहे.

वैयक्तिक आयुष्य

1992 मध्ये सत्या यांचे अनुपमा यांच्याशी लग्न झाले. अनुपमा या त्यांच्या वडिलांच्या मित्राची मुलगी होत्या. नंतर या जोडप्याला दोन मुली आणि एक मुलगा झाला. सध्या हे कुटुंब बेलव्यू, वॉशिंग्टन येथे राहते. नडेला यांना फावल्या वेळेत कविता वाचायला फार आवडते. त्यांना क्रिकेटचा खरोखरच खूप आवड आहे आणि क्रिकेटला आपली नेतृत्व क्षमता वाढण्या मागील कारणांपैकी एक कारण ते मानतात.