Interglobe Aviation: देशातील सर्वसामान्य जनतेला परवडणारी विमानसेवा म्हणून इंडिगो ओळखली जाते. देशातील अनेक प्रवासी इंडिगोच्या विमान सेवेला प्राधान्य देताना दिसतात, मात्र समोर आलेल्या बातमीनुसार इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनच्या विरोधात आयकर विभागाकडून कर मागणीची नोटीस जारी करण्यात आली आहे. ही नोटीस वर्ष 2016-2017 आणि 2017-2018च्या कराची मागणी केल्याच्या संबंधात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आणि म्हणूनच इंडिगो विमानसेवेच्या पालक कंपनी विरोधात 1,666 कोटींपेक्षा अधिक रुपयांची कर मागणी करण्यात आली आहे.
यावर कंपनीची(Interglobe Aviation) प्रतिक्रिया काय?
आयकर विभागाकडून इंटरग्लोब एव्हिएशन (Interglobe Aviation) या कंपनीला वर्ष 2016-17 साठी 739.68 कोटी रुपये तर वर्ष 2017-18 साठी 927.03 कोटी रुपयांचा कर भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश कंपनीला मान्य नसल्यामुळे त्यांनी या विरोधात आयकर आयुक्त यांच्याकडे अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीला विमान आणि इंजिनच्या संपादनासह उत्पादकांकडून मिळालेल्या काही प्रोत्साहनांच्या कर प्रणालीवरील करपात्र उत्पन्नाच्या सुधारणेची आणि काही खर्चाची परवानगी न देता तसेच वैयक्तिक सुनावणीची संधी न देता हि नोटीस जारी करण्यात आली होती, त्यामुळे कंपनी(Interglobe Aviation) कायद्याचा व्यवस्थित अभ्यास करून आणि वकिलांशी सल्ला- मसलत केल्यानंतर योग्य पावले उचलून या निर्णयाला आवाहन देणार आहे.